कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया रद्द; जिल्हा उपनिबंधक यांची माहिती

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया रद्द झालेली असून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकारणाकडून आदेश पारीत झाल्यानंतरच बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, चोपडा व रावेर यांच्या मतदारांची मतदार यांदी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव, भुसावळ, बोदवड, जामनेर, धरणगाव व यावल या बाजार समित्यांना मतदारांची प्राथमिक/तात्पुरती मतदार यादी सादर करण्याबाबत या कार्यालयामार्फत कळविण्यात आले होते.

मात्र, बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिका क्रमांक 11669/2021 व इतर संलग्न याचिका यात मा. उच्च न्यायालय,खंडपीठ औरंगाबाद यांनी 18 नोव्हेंबर 2021 रोजी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू करावी, असा आदेश पारीत केलेला आहे. या आदेशास अनुसरुन मा. सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील 22 नोव्हेंबर 2021 रोजीच्या आदेशान्वये प्राधिकरणाकडील 6 व 21 ऑक्टोबर 2021 रोजीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. सदर आदेशान्वये कृषी उत्पन्न बाजार समिती मतदार यादीवर आक्षेप/हरकती मागविण्याची प्रक्रिया राबवलेली आहे ती प्रकिया रद्द करण्यात आलेली आहे.

या आदेशामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया रद्द झालेली असून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यासंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्याकडून आदेश पारीत झाल्यांनतरच बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जळगाव, यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

‘… म्हणून बोंडअळी निर्मूलनासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे महत्वाचे आहे’

Next Post
पहिली ते चौथीचे प्रत्यक्ष वर्ग सुरु होणार ? राजेश टोपे म्हणाले...

पहिली ते चौथीचे प्रत्यक्ष वर्ग सुरु होणार ? राजेश टोपे म्हणाले…

Related Posts
Supriya Sule

RSS मार्गदर्शक असलेला भाजप समाजात अंतर पाडत आहे- सुप्रिया सुळे

बारामती – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर (BJP) पुन्हा एकदा निशाना साधला आहे. आरएसएस (RSS) मार्गदर्शक…
Read More
पुलवामा स्फोटात वापरलेली स्पोटके नागपूरमधून गेली पण त्याचा छडा अद्याप लावला जात नाही - पटोले

पुलवामा स्फोटात वापरलेली स्पोटके नागपूरमधून गेली पण त्याचा छडा अद्याप लावला जात नाही – पटोले

नागपूर – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्यामागे अवकाळी पाऊस लागला व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पण हे सरकार…
Read More
सुपारी फक्त हातपाय तोडण्याची होती, पण..', सतीश वाघ प्रकरणात नवीन खुलासा

सुपारी फक्त हातपाय तोडण्याची होती, पण..’, सतीश वाघ प्रकरणात नवीन खुलासा

भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्याप्रकरणात (Satish Wagh case) मामी मोहिनी वाघ पोलीस कोठडीत…
Read More