IPL 2023 आधी कर्णधार हार्दिक पंड्याची चिंता वाढली! हा डॅशिंग खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर असू शकतो

IPL : आयपीएल (IPL)ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. अनेक स्टार खेळाडूंनी येथे खेळून आपली कारकीर्द घडवली आहे. प्रत्येकजण आयपीएल 2023 च्या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहे. IPL 2023 चा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (Gujarat Titans and Chennai Super Kings) यांच्यात 31 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होणार आहे. गुजरात टायटन्सने गेल्या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले, परंतु आता आयपीएल 2023 च्या आधी गुजरात टायटन्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. त्यांचा एक स्टार खेळाडू जखमी झाला आहे.

आयपीएल 2023 च्या लिलावात गुजरात टायटन्सने आयर्लंडच्या जोस लिटलला (Joshua Little) 4.40 कोटी रुपयांना विकत घेतले. आयपीएल लिलावात विकत घेतलेला जोस हा आयर्लंडचा पहिला खेळाडू ठरला. SA20 मध्ये प्रिटोरिया कॅपिटल्सकडून खेळताना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे जोस लिटलला संपूर्ण पाकिस्तान सुपर लीग हंगामातून बाहेर काढण्यात आले आहे. चांगल्या उपचारासाठी तो आपल्या देशात परतला आहे. पीएसएलचा अंतिम सामना १९ मार्चला होणार आहे. त्याच वेळी, आयपीएल 31 मार्चपासून सुरू होत आहे. अशा स्थितीत जोस लिटलची दुखापत अधिक गंभीर असेल, तर त्याला आयपीएलमध्ये खेळणे कठीण वाटते.

T20 विश्वचषक 2022 मध्ये जोस लिटलने आपल्या दमदार गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली. 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याने 11 विकेट घेतल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने केन विल्यमसन, जिमी नीशम आणि मिचेल सँटनर यांची विकेट घेत हॅट्ट्रिक पूर्ण केली. यानंतर तो सर्वांसाठी हिरो बनला आणि गुजरात टायटन्सने त्याला आयपीएल 2023 च्या लिलावात आपल्या कॅम्पमध्ये समाविष्ट केले, परंतु आता त्याच्या दुखापतीमुळे गुजरात टायटन्स फ्रँचायझीच्या अडचणी वाढल्या आहेत.