मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचावर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल!

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात युवासेनेचे कार्यकारिणी सदस्य श्री. राज कुळकर्णी यांनी फिर्याद दिली असून @Pralhad_Bamne या ट्विटर हॅंडलच्या चालकावर भादवि कलम १५३ (अ), ५००, ५०५ (२) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज कुळकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सदरील ट्विटर हॅंडलने समाजात असंतोष निर्माण होईल, या उद्देशाने 16 जुलै २०२२ दरम्यान आक्षेपार्ह, अपमानास्पद, लज्जास्पद आणि आपत्ती निर्माण होईल, असा मजकूर पोस्ट केलेला आहे’.

या संदर्भात माहिती देताना देताना कुळकर्णी म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांविरोधातील आक्षेपार्ह टीका आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. त्यांना कडक कायदेशीर भाषेतच उत्तर दिले जाईल. समाजात द्वेष निर्माण करण्यासाठी काही घटक यात जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांची बदनामी करत असण्यातच शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा समाजकंटकांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी’.

महाराष्ट्र सायबर अधिक्षकांकडे कडक कारवाईची युवा सेनेची मागणी
सायबर पोलीसांत गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी युवा सेना कार्यकारिणी सदस्य राज कुळकर्णी यांनी राज्याच्या सायबर सेलचे पोलीस अधिक्षक संजय शिंत्रे यांच्याकडे केली आहे. कारवाईच्या मागणीचे पत्र राज कुळकर्णी यांनी शिंत्रे यांना दिले असून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन शिंत्रे यांनी दिले आहे.