Ravindra Waikar | रवींद्र वायकरांच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल; नातेवाईकाने आणले खासदाराला गोत्यात 

Ravindra Waikar | उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचे खासदार रवींद्र वायकरांच्या नातेवाईकासह निवडणूक अधिका-यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय…एम पंडिरकर हे रविंद्र वायकर यांचे नातेवाईक आहेत तर दिनेश गुरव निवडणुक अधिकारी आहेत.

अमोल किर्तीकर आणि वायकर (Ravindra Waikar) यांच्या थेट लढतीत 48 मतांनी वायकरांना विजयी घोषित करण्यात आले होते. गोरेगाव येथील नेस्को मतदान केंद्रावर मतमोजणीदरम्यान रविंद्र वायकर यांचे नातेवाईक एम. पंडिरकर हे मोबाईल घेऊन आले होते. मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास सक्त मनाई असताना त्यांना निवडणुक अधिकारी दिनेश गुरव यांनी मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी दिली होती.

हा प्रकार उघडकीस येताच भारत जन आधार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वायकरांसह त्यांच्या नातेवाईक आणि निवडणुक अधिका-याविरुद्ध वनराई पोलिसांत तक्रार केली…या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या दोघांनाही चौकशीसाठी समन्स बजाविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like