केंद्र व भाजपने देशाची माफी मागावी!: अशोक चव्हाण

मुंबई – केंद्राचे तीन काळे कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय हा शेतकरी एकजुटीचा विजय असून, या कायद्यांविरोधातील आंदोलनात शेतकऱ्यांवर झालेली दडपशाही, अत्याचार व अवमानाबद्दल केंद्र सरकार व भारतीय जनता पक्षाने देशाची माफी मागावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. चव्हाण यावेळी म्हणाले की, नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला अनेक ठिकाणी दारूण पराभव स्वीकारावा लागला. उत्तर प्रदेश, पंजाब व अन्य राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकीतही शेतकरी आंदोलनाचा फटका बसू शकतो, याची भीती केंद्र सरकारला जाणवू लागली होती. त्यामुळेच उशीरा का होईना केंद्राला हा निर्णय घ्यावा लागला. हाच निर्णय अगोदर घेतला असता तर अनेक शेतकऱ्यांचे प्राण वाचू शकले असते.

केंद्राच्या तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना दहशतवादी, देशद्रोही अशी अनेक दूषणे देण्यात आली. त्यांचे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून ठार मारण्याचा प्रकार घडला. या साऱ्या प्रकारांबाबत देशाची व शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. शेतकऱ्यांसमोर झुकून केंद्राला एक दिवस हे कायदे रद्द करावेच लागतील, असे भाकित काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यापूर्वी केले होते. त्यांच्या त्या विधानाचीही आठवण अशोक चव्हाण यांनी यावेळी करून दिली.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

अत्यावश्यक कामांचा प्राधान्यक्रम ठरवून ती तातडीने मार्गी लावण्यात यावी – छगन भुजबळ

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांची लसीकरण केंद्रांना आकस्मिक भेट; गैरहजर कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

Related Posts
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा - धनंजय मुंडे

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – धनंजय मुंडे

Dhananjay Munde – राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त (Farmers Suicide) जिल्ह्यात कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तरतूद करण्यात आलेला…
Read More
Neelam Gorhe | पुण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने भरघोस निधी देत अनेक विकासात्मक कामे पूर्ण केली

Neelam Gorhe | पुण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने भरघोस निधी देत अनेक विकासात्मक कामे पूर्ण केली

पुणे | शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये…
Read More
ABVP Gangakhed

गंगाखेडमधील तिरंगा पदयात्रेला उत्तम प्रतिसाद; देशभक्तीपर घोषणांनी आसमंत दुमदुमला

गंगाखेड / विनायक आंधळे :– भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण (Independence Day) होत आहेत. यानिमित्त देशभरात…
Read More