विनायक मेटेंच्या मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार, संभाजीराजे छत्रपतींचा गंभीर आरोप

मुंबई – शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती.

दरम्यान,  हा अपघात झाल्यानमंतर एक तास उशिराने आपत्कालीन मदत पोहोचली. याच कारणामुळे राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी तर या घटनेला केंद्र आणि राज्य सरकार जबाबादार आहे, अशा गंभीर आरोप केला आहे. अपघात झाल्यानंतर लवकर आप्तकालीन मदत मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे काय नियमावली आहे, असा सवालही त्यांनी केला.

विनायक मेटे यांना मी श्रद्धांजली वाहतो. सरकारने जी चौकशी करायची आहे ती करावी. विनायक मेटे यांच्या मृत्यूला केंद्र तसेच राज्य सरकार जबाबदार आहे. अपघात झाल्यानंतर मेटे यांना एक तास उशिराने आपत्कालीन मदत मिळाली. सरकारकडे आपत्कालीन सुविधा पुरवण्याची काय नियमावली आहे, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला.

मुंबई-पुणे या मार्गावर रहदारी असते. येथे आपत्कालीन मदत पोहोचविणाऱ्या दोन ते तीन गाड्या असायला हव्यात. अशी अचानक घटना घडली तर मदत पोहोचावी म्हणून केंद्र तसेच राज्य सरकारने योग्य ती तरतूद करायला हवी, अशी मागणीदेखील संभाजीराजे छत्रपती यांनी केली.