Onion farmer | केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क पूर्णतः रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, 1 एप्रिल 2025 पासून याची अंमलबजावणी होणार आहे.या निर्णयामुळे विशेषतः लासलगाव आणि पिंपळगाव येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. निर्यात शुल्क हटवल्यामुळे कांद्याला अधिक चांगला दर मिळण्याची अपेक्षा असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
नेत्यांचे स्वागत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले.हा निर्णय लागू झाल्यानंतर कांदा उत्पादकांना जागतिक बाजारपेठेत मोठी संधी मिळेल आणि भारतीय कांद्याची निर्यात (Onion farmer) वाढण्याची शक्यता आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
आमदार सुरेश धस अडचणीत; राजीनाम्यासह नार्को टेस्टची मागणी
उन्हाळी सुट्टीत एसटीचा थंडगार प्रवास, राज्यभर 872 शिवशाही बसेस धावणार
पाण्याचा अधिक वापर केल्यास नळ कनेक्शन तोडणार; पुणे महापालिकेचा इशारा