केंद्र सरकारचे आता व्होडाफोन-आयडियामध्ये 35 टक्के भागभांडवल

Vodafone-Idea : केंद्र सरकारने व्होडाफोन-आयडियाला मोठा दिलासा दिला आहे. केंद्राने कंपनीला थकबाकी भरण्यासाठी एक नवीन ऑफर सादर केली आहे. नवीन ऑफरमध्ये केंद्र सरकारने (Central Govt) या कर्जबाजारी कंपनीच्या व्याजाच्या बदल्यात इक्विटी हस्तांतरित करण्याची ऑफर दिली आहे.

आता या कंपनीत केंद्र सरकारचीही हिस्सेदारी असणार आहे. व्होडाफोन-आयडियावर 16,133 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्याज देणे बाकी आहे. केंद्राच्या या निर्णयाची माहिती कंपनीने शेअर बाजारालाही (stock market) दिली आहे. या निर्णयानंतर केंद्र सरकारचा कंपनीत सुमारे एक तृतीयांश हिस्सा राहणार आहे.

सरकारच्या या निर्णयानंतर इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित होणारी एकूण रक्कम 16,133,18,48,990 रुपये आहे. कंपनीला प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याचे 1613,31,84,899 इक्विटी शेअर्स जारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांची इश्यूची किंमत देखील 10 रुपये आहे. सरकारला आता कंपनीत 35 टक्के हिस्सा मिळणार आहे.