आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ नाराज

नाशिक – शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे (Shiv Sena Minister Aditya Thackeray) यांच्या नाशिक दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ (NCP Minister Chhagan Bhujbal) नाराज झाल्याचे वृत्त आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर होते. त्या दौऱ्यावर आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत बोलताना ते म्हणाले, आदित्य ठाकरेंनी आधी चौकशी करावी, आदिवासी पाड्यांवर अगोदरपासून काम सुरु आहे. काम अगोदरच सुरू झालेलं असताना हे काम शिवसेनेने केलं हे दाखवणे चुकीचं आहे. हे म्हणजे जिल्हाप्रशासन आणि अन्य खात्यांवर अन्याय (Injustice on district administration and other accounts) करण्यासारखं आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

श्रेय कुणीही घ्या, पण काम अगोदरच सुरू झालेलं आहे. कुठल्याही कामाला 2- 3 महिने जावे लागतात. मंत्र्यांना मिसलीड (Mislead) केलं जातं, स्थानिक नेत्यांनीही आपल्या नेत्यांना मिसलीड करू नये आणि तिथे नेऊन बसवू नये, असे म्हणत छगन भुजबळ यांनी नाशिकमधील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना टोला लगावला आहे.