Congress party | चंद्रपूर जिल्ह्यातील माजी पोलीस अधिकारी सुधाकर कुंडलिक अंबोरे आणि सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक राहुल निरंजनराव तायडे यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवन, दादर येथे आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष धोटे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यावेळी उपस्थित होते. प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी दोघांचेही काँग्रेस परिवारात स्वागत करुन काँग्रेस विचार घरोघरी पोहचवा असे आवाहन केले.
“काँग्रेस पक्षाची (Congress party) विचारधारा हीच शाश्वत असून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष विजयाचे एक एक शिखर पार करत आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला कौल दिला. काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातून सर्वात जास्त जागा जिंकत राज्यात दैदिप्यमान कामगिरी करत काँग्रेस हाच पर्याय असल्याचे दाखवून दिले आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही सर्वात जास्त जागा जिंकून विधानसभेवर काँग्रेसचा तिरंगा झेंडा फडकवू”, असा विश्वास प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप