Chandrashekhar Bawankule | झाड-पत्यासारखी मोदीजींच्या वादळामध्ये महाविकास आघाडी उडाली आहे, बावनकुळेचा टोला

Chandrashekhar Bawankule | पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी असा दावा केला आहे की भाजपा देशात २०३ पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी लोकसभा प्रवासादरम्यान ते बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण तुम्ही जरा तुमचा आकडा बघून घ्या आणि महाराष्ट्रात तुमचा सुपडा साफ होणार आहे. शरद पवार यांना माहित झाल आहे की बारामती त्यांच्या हातून जाणार आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा फुगा फुटलेला आहे, झाड-पत्यासारखी मोदीजींच्या वादळामध्ये महाविकास आघाडी उडाली आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रामध्ये महायुतीला प्रचंड ताकद मिळत आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण जे बोलत आहेत ते त्यांच्या समाधानासाठी बोलत आहेत. ते एक गोष्ट बरोबर बोले आहेत 4 तारखेनंतर या महाराष्ट्रात तुम्हाला दोन पक्ष दिसणार नाही. दुसऱ्या दिवशी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी विलीनीकरणाची भाषा सुरु केली. पृथ्वीराज चव्हाण यांनी जे म्हणतात त्याचा सरळ अर्थ आहे की या महाराष्ट्र्रात 6 पक्ष आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी याना विलीन करावी लागेल यांच अस्तित्व संपणार आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांच्या बोलण्यावरून वाटत, असेही त्यांनी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप