‘भाजप आणि अजित पवार यांचे प्रेम पाहून राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोकांच्या पोटात दुखत आहे ‘

Nagpur – देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळा (Dedication ceremony of stone of Saint Tukaram temple at Dehut) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते झाला. प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवारांना (Ajit Pawar) पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणं बंधनकारक आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. पण त्यांना बोलू दिलं नाही.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांचे भाषण झाल्यानंतर सूत्रसंचालकांनी थेट पंतप्रधानांचे नाव पुकारलं. ही बाब लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावं असं सांगितलं. पण सूत्रसंचालकांनी नावच न पुकारल्याने अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही.

दरम्यान, या घडामोडींवर आता भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. पंतप्रधान मोदी आणि अजित पवार यांचे एकमेकांबद्दल चांगले मत आहे. तसेच भाजप आणि अजित पवार यांचे प्रेम पाहून राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोकांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळेच देहूमधील मंचावरील प्रसंगाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोक वाद निर्माण करत असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

मला असे वाटते की कालच्या प्रसंगाबद्दल अजित दादांना आक्षेप नाही. उलट राष्ट्रवादीत कुणाच्या तरी पोटात दुखतंय की अजित दादा आणि भाजप एकमेकांशी प्रेमाने वागत आहे. पंतप्रधान आणि अजित दादा यांचे एकमेकांबाबत चांगले मत आहे आणि ते मत बिघडवण्यासाठी राष्ट्रवादीतील एक गट प्रयत्न करतो आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. राष्ट्रवादीत अनेकांना आज ही वाटते की उद्या अजित दादा पुन्हा उलटसुलट करतील. त्यामुळेच निर्माण केला जात आहे,असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.