Chandrashekhar Bawankule | सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून भगव्याचा अवमान, बावनकुळेंची सणसणीत टीका

Chandrashekhar Bawankule | सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून भगव्याचा अवमान, बावनकुळेंची सणसणीत टीका

Chandrashekhar Bawankule | संघाचं फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली होती. यावरुन आता भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून भगव्याचा अवमान करण्यात असल्याचे टीकास्त्र सोडले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून ट्विट करत लिहिले, परम पवित्र भगवा ध्वज करोडो हिंदुंची अस्मिता आणि स्वाभिमान आहे. त्याला फडकं म्हणण्याचा नतदृष्टेपणा उद्धव ठाकरेंनी केला. हाच भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ह्याच झेंड्याखाली शिवसेना उभारली पण उद्धव ठाकरेंना ते फडकं वाटतंय. आज बाळासाहेब ठाकरे असते तर भगव्या ध्वजाचा असा अपमान त्यांनी कधीच सहन केला नसता पण दुर्दैवानं सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरे भगव्याचा अवमान करत आहेत, असा घणाघात बावनकुळेंनी केला आहे.

उद्धव ठाकरे थोडी जनाची नाही तर मनाची लाज उरली असेल तर भगवा ध्वज काय आहे हे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या शब्दात वाचा…

कभी थे अकेले हुए आज इतने
नही तब डरे तो भला अब डरेंगे
विरोधों के सागर में चट्टान है हम
जो टकराएंगे मौत अपनी मरेंगे
लिया हाथ में ध्वज कभी न झुकेगा
कदम बढ रहा है कभी न रुकेगा
न सूरज के सम्मुख अंधेरा टिकेगा
निडर है सभी हम अमर है सभी हम
के सर पर हमारे वरदहस्त करता
गगन में लहरता है भगवा हमारा॥

भगव्या ध्वजाला फडकं म्हणून तुम्ही कितीही शिव्याशाप दिल्या तरी हाच भगवा सदैव आमचं रक्षण करणार आहे, असेही त्यांनी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
RCBvsCSK | चिंता मिटली! पावसामुळे RCBvsCSK सामना रद्द होणार नाही? 1 मिनिटात 10 हजार लिटर पाणी सुखणार

RCBvsCSK | चिंता मिटली! पावसामुळे RCBvsCSK सामना रद्द होणार नाही? 1 मिनिटात 10 हजार लिटर पाणी सुखणार

Next Post
swimming pool | स्विमिंग पूलच्या पाण्यात मिसळले जाते क्लोरिन, यामुळे शरीराला काय नुकसान होतं माहितीय का?

swimming pool | स्विमिंग पूलच्या पाण्यात मिसळले जाते क्लोरिन, यामुळे शरीराला काय नुकसान होतं माहितीय का?

Related Posts
"बाहेरच्या पक्षातून आमच्याकडे आलेल्यांना..."; अजित पवार पक्षातील चाकणकर अन् रुपाली ठोंबरे आमने सामने

“बाहेरच्या पक्षातून आमच्याकडे आलेल्यांना…”; अजित पवार पक्षातील चाकणकर अन् रुपाली ठोंबरे आमने सामने

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या 22…
Read More
मृत्यू

आंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांना वीजवाहक तारेचा धक्का लागून मृत्यू

अहमदनगर – अहमदनगर(Ahmednagar) जिल्ह्यातल्या संगमनेर(Sangamner) तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी परिसरातील वांदरकडा इथल्या तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांना वीजवाहक(power conductor)…
Read More
sangali sadhu

पालघर हत्याकांडावरून आकांडतांडव करणारे सांगलीत साधूंना मारहाण झाल्यावर गप्प का ?

मुंबई – सांगलीत चोर आणि मुलं पळविणारी टोळीसमजून साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी पालघरमध्ये…
Read More