Chandrashekhar Bawankule | राहुल गांधी सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल उद्धव ठाकरे गप्प का?

Chandrashekhar Bawankule | राहुल गांधी सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल उद्धव ठाकरे गप्प का?

Chandrashekhar Bawankule | एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एक्स अकाउंटवरून उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

पुढे बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत.

१. दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय?
२. ⁠१९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता?, हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का?
३. ⁠सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात?
४. ⁠ राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात?
५. ⁠उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता?

उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान आहे की, हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत, महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत आहे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

Next Post
PM Modi | पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत तर आम्ही घालू, पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

PM Modi | पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत तर आम्ही घालू, पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

Related Posts

कमाल, लाजवाब! कोहलीच्या ‘विराट’ खेळीमुळे भारताने २० वर्षांनंतर न्यूझीलंडला विश्वचषकात केले पराभूत

IND vs NZ World Cup: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात धरमशाला येथे विश्वचषकातील २१ वा…
Read More
Dhairyasheel Mane | शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेते पदी खासदार धैर्यशील माने यांची निवड

Dhairyasheel Mane | शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेते पदी खासदार धैर्यशील माने यांची निवड

लोकसभेतील शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. धैर्यशील माने…
Read More
नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी यांना राज्यातून पंधरा लाख लाभार्थ्यांची आभाराची पत्रे पाठवली जाणार

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी सर्वसामान्य लोकांसाठी केलेल्या योजनांचा लाभ झालेल्या राज्यातील लाभार्थ्यांशी(with beneficiaries) संपर्क साधून…
Read More