उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; मुंबईतून झाली आता गळती सुरु 

 मुंबई – मुंबईतील प्रभाग क्रमांक 121च्या नगरसेविका चंद्रावती मोरे आणि शाखाप्रमुख मनीष नायर यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला.(Chandravati More and Manish Nair joined the Shiv Sena yesterday in the presence of Chief Minister Eknath Shinde.).

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती पाहून ते आपल्या प्रभागातील प्रलंबित विकासकामे नक्की पूर्ण करतील याची खात्री वाटल्यानेच आज शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे चंद्रावती मोरे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना चंद्रावतीताईंनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवत त्यांच्या प्रभागातील एकूण एक प्रलंबित कामे नक्की पूर्ण केली जातील अशी ग्वाही यावेळी दिली.दरम्यान, राज्यभरातून अनेकजण शिवसेनेत प्रवेश करत होते मात्र मुंबईतून म्हणावे तेवढे पक्ष प्रवेश होत नव्हते आता या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने मुंबईतून देखील गळती सुरु असल्याचे दिसून येत आहे.

यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, ठाणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक राम रेपाले, शिवसेना उपनेत्या सौ. कला शिंदे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, शिवसेना प्रवक्त्या माजी नगरसेविका सौ. शीतल म्हात्रे तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.