शिंदे गटाच्या आमदारांना आणखी पाच खोके दिले गेले; खैरेंच्या दाव्याने खळबळ 

मुंबई – नेहमी भडक वक्तव्ये करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे पुन्हा एकदा भडक वक्तव्य केल्याने चर्चेत आले आहेत.शिंदे गटावर चंद्रकांत खैरे यांनी नवा आरोप केलाय. गुवाहाटी दौऱ्यात आमदारांना पाच-पाच कोटी देण्यात आले. असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केलाय.

२६ नोव्हेंबरला शिंदे गटाचे आमदार पुन्हा गुवाहाटीला गेले. कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी  आरोप केलाय. शिंदे गटाचे आमदार इकडे तिकडे भरकटू नये म्हणून आणखी पाच-पाच कोटी आमदारांना देण्यात आल्याचा आरोप खैरे यांना केलाय.

खात्रीलायक माहिती मला एका उद्योगपतीनं हे सांगितलं. सरकार जपण्यासाठी हे गद्दार करत आहेत. आमदारांच्या खुशामती केल्या जातात. हे चुकीचं असल्याचं चंद्रकांत खैरे म्हणाले.