कोथरूड मध्ये ‘हर घर तिरंगा’अभियान १००% यशस्वी होणार; चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील ( MLA Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीमध्ये बूथ सशक्तीकरण अभियानाअंतर्गत आज भाजपा कोथरुड मंडलाची बैठक पार पडली. या मध्ये बूथ व शक्तिकेंद्रश: आढावा घेतला गेला. ‘हर घर तिरंगा'(Har Ghar Tiranga) अभियानाला कोथरुड मंडलातून सर्वोत्तम प्रतिसाद मिळावा यासाठी संपर्क अभियान कसे राबवायचे याचे मार्गदर्शन चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज. देशाचे पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपणही आपल्या घरांवर तिरंगा फडकावून तसेच २ ते १५ ऑगस्टला सोशल मीडिया प्रोफाईल वर तिरंगा लावून आपल्या मनात भारतमातेविषयी असलेल्या भावना व्यक्त करुया. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे लोक झटले, हुतात्मा झाले त्या सर्वांना नमन करण्यासाठीव त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपक्रम राबवा. आपल्या बूथ मधील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून नागरिकांना तिरंगा देऊन हे अभियान यशस्वी करून देशभक्तीचा जागर करूया असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

या बैठकीला भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा युवा मोर्चाचे सुशील मेंगडे, शहर सरचिटणीस दीपक पोटे, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, (BJP Pune City President Jagdish Mulik, Rajesh Pandey, Muralidhar Mohol, Sushil Mengde, City Deepak Pote, Puneet Joshi,) अभियान समन्वयक प्रशांत हरसुले, गणेश कळमकर, कुलदीप साळेगावकर, बाळासाहेब टेमकर यांच्यासह कोथरुडमधील भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.