वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी; जीव गमावलेल्या आठ जणांची ओळख पटली 

नवी दिल्ली- जम्मू आणि काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिरात आज पहाटे भाविकांची चेंगराचेंगरी होऊन 12 जण ठार तर अन्य 12 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत जाहीर केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

चेंगराचेंगरी मुळे वैष्णोदेवी यात्रा थांबवण्यात आली आहे. नववर्षानिमित्त माता वैष्णोदेवी मंदिरात दर्शन घेण्यासाठी अनेक राज्यातून भाविक कटरा येथे पोहोचले आहेत. सणाच्या निमित्ताने माता वैष्णोदेवी मंदिरात (Mata Vaishno Devi Bhawan) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या इतर दिवसांच्या तुलनेत वाढते, त्यामुळे चेंगराचेंगरी कशी झाली, हेही कळू शकलेले नाही.

दरम्यान, माता वैष्णोदेवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या आठ जणांची ओळख पटली आहे. या घटनेत जम्मू-काश्मीरमधील नौशेरा राजौरी येथील रहिवासी धीरज कुमार, यूपीच्या गाझियाबाद येथील श्वेता सिंग, दिल्लीचे विनय कुमार आणि सोनू पांडे, हरियाणातील झज्जर येथील ममता, यूपीतील सहारनपूरचे धरमवीर सिंग आणि विनीत कुमार आणि गोरखपूरचे अरुण प्रताप यांचा समावेश आहे. सिंग यांना प्राण गमवावे लागले.