स्वस्त धान्य दुकादारांना स्वस्त धान्या व्यतिरिक्त काही वस्तू विकण्यास परवानगी – छगन भुजबळ

मुंबई – स्वस्त धान्य दुकादारांच्या समस्या सोडविण्यासाठी (To solving Cheap Grain Shopkeepers) आम्ही कटिबद्ध आहोत या दुकानांवर स्वस्त धान्या व्यतिरिक्त काही वस्तू विकण्यास परवानगी देण्यात आलेली आहे त्यात स्टेशनरीचा समावेश आहे. अशी माहिती मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली मंत्रालयात अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ यांच्या विनंतीवरून आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.

मंत्रालयातील दालनात आयोजित केलेल्या बैठकीला अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्थ धान्य दुकानदार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पुष्पराज देशमुख, राज्य संघटना अध्यक्ष, डी.एन पाटील, उपाध्यक्ष राजेश अंबुसकर , चंद्रकांत यादव, विजय पंडित, प्रभाकर पाडले आणि महाराष्ट्रभरातून आलेले स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

स्वस्त धान्य दुकनदारांच्या अनेक समस्या आहेत त्यातल्या काही मागण्या केंद्र सरकारशी निगडित आहे. आम्ही त्याबाबत देखील पत्रव्यवहार करत आहोत मात्र स्वस्त धान्य दुकानदाराला दोन पैसे अधिकचे मिळावे यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य व्यतिरिक्त अन्य पदार्थ विकायला आम्ही परवानगी दिली आहे. त्यात स्टेशनरी, शाम्पू, साबण, डिटर्जंट, हॅण्डवॉश, चाहापत्ती, कॉफी, या वस्तूंचा समावेश आहे. येणाऱ्या काळात आणखी काही गोष्टींचा समावेश यात करण्यासाठी विचार चालू असल्याची माहिती देखील मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.

स्वस्त धान्य दुकादारांच्या धान्य पुरवठा आणि अन्य काही मागण्यांबाबत आगामी काळात बैठक आयोजित करून ते प्रश्न देखील तातडीने सोडवू असे आश्वासन देखील मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिले