Chhagan Bhujbal | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तालुक्यात प्रभावी अंमलबजाणी करावी असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. आज येवला येथे आयोजित विविध विकासकामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बैठकीस प्रांताधिकारी येवला बााबासाहेब गाढवे, प्रांताधिकारी निफाड हेमांगी पाटील, येवला तहसिलदार आबा महाजन, निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे,येवला नगरपरिषदचे मुख्याधिकारी किरण देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक कार्यकारी अभियंता के.के आव्हाड, नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प विभागाचे अधीक्षक कार्यकारी अभियंता मनोज ढोकचौले, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आज मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही ग्रामपातळीवरही राबविण्याच्या दृष्टीने याचा लाभ सर्व माता व भगिनींपर्यंत पोहचविण्यासाठी ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व प्रशासनाने सर्वोतोपरी सहाय्य करावयाचे आहे. या योजनेच्या लाभातून एकही महिला वचिंत राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावयाची आहे. शहरासोबतच गावागातही शेतमजूर महिला, कष्ठकरी महिलांचे या योजनेसाठी फॉर्म भरून घ्यावयाचे आहेत. यात कसूर होता कामा नये असे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप