नेता असावा तर असा : महत्वाची सर्व कामे बाजूला ठेवत छगन भुजबळ धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला 

नेता असावा तर असा : महत्वाची सर्व कामे बाजूला ठेवत छगन भुजबळ धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला 

येवला – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हे येवला दौऱ्यावर असतांना दौरा आटोपून पुढच्या कार्यक्रमासाठी निफाड कडे जात होते. यावेळी येवला विंचूर रस्त्यावर धुळगाव फाटा येथे नुकताच एका कारचा अपघात झालेला होता. याठिकाणी त्यांनी थांबून अपघाताची पाहणी केली.

यावेळी सोबत असलेल्या पदाधिकऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका येईपर्यंत त्याठिकाणी थांबत अपघात ग्रस्तांना मदत केली. अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेत बसविल्यानंतर त्यांनी तातडीने येवला येथील डॉक्टरांना फोनवरून संपर्क करत अपघात ग्रस्तांना दाखल करून उपचार करण्याच्या सूचना केल्या. तसेच यासाठी आपल्या कार्यालयातील लोकांना अपघातग्रस्त ठिकाणी थांबवून त्यांना आवश्यक ती मदत करण्याचा सूचना केल्या.

येवला- नाशिक या मार्गावर ठिकठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती चालू आहे. ज्या ठिकाणी दुरुस्तीची कामे चालू असतील अश्या ठिकाणी ठळक अक्षरात वाहनांना योग्य दिशा दर्शविण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देश मंत्री भुजबळ यांनी दिले त्याचप्रमाणे गरज असल्यास वाहतूक विभागाची मदत घेऊन वाहतूक वळविण्यात यावी असे आदेश देखील मंत्री भुजबळ यांनी दिले.

हे ही पहा:

https://www.youtube.com/watch?v=LzuSxTK78ws

Previous Post
Jayant Patil

‘ठाण्यातील नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वकाही दिले पण याच लोकांनी ऐनवेळी धूम ठोकली’

Next Post
निवडणुका जवळ आल्या की भाजपचे ओबीसी प्रेम जागे होते; छगन भुजबळ यांचा विरोधकांवर निशाणा

निवडणुका जवळ आल्या की भाजपचे ओबीसी प्रेम जागे होते; छगन भुजबळ यांचा विरोधकांवर निशाणा

Related Posts

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य; “बार्टी”च्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप मंजूर 

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने  देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन…
Read More
अभिजीत भालके यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी निवड

अभिजीत भालके यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी निवड

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी अभिजीत भालके( Abhijit Bhalke) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार प्रताप…
Read More
उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसा पण शेतकरी, कर्मचाऱ्यांसाठी नाही ?

उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसा पण शेतकरी, कर्मचाऱ्यांसाठी नाही ?

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे सरकार कोणत्याही मुद्द्यांवर केवळ सकारात्मक आहे असे म्हणून वेळ मारून नेते पण ठोस…
Read More