पुण्यात होणाऱ्या एमपीएलमध्ये खेळणा-या मराठवाड्याच्या छत्रपती संभाजी किंग्ज संघाची फ्रेंचाईजी धनंजय मुंडेंकडे!

पुणे (दि. 08) – पुण्यात आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीग (एमपीएल) क्रिकेट स्पर्धांचे 15 ते 29 जून दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजन केले आहे. महाराष्ट्राच्या सहा विभागातील सहा संघ या लीग मध्ये खेळणार असून, मराठवाड्याचा छत्रपती संभाजी किंग्स हा संघ मराठवाड्याचे प्रथमच प्रतिनिधित्व करणार आहे.
छत्रपती संभाजी किंग्स या संघाची फ्रंचाईजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.धनंजय मुंडे यांच्या सहकाऱ्यांच्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतली आहे.
नेहमी राज्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या धनंजय मुंडे यांनी यानिमित्ताने प्रथमच राज्य स्तरावरील क्रिकेट विश्वातही पदार्पण केले आहे.
या लीग मध्ये कोल्हापूर टस्कर्स, पुणेरी बाप्पा, ईगल नाशिक टायटन्स, रत्नागिरी जेट्स, सोलापूर रॉयल्स आणि धनंजय मुंडे यांच्या मालकीचा छत्रपती संभाजी किंग्स हे सहा संघ सहभागी होत आहेत. सर्वच संघांनी आपले आयकॉन प्लेयर्स नियुक्त केले असून, भारतासाठी अंडर 19 वर्ल्ड कप खेळलेला, तसेच रणजी खेळाडू व आयपीएल मधील चेन्नई सुपर किंग्स संघाचा वेगवान गोलंदाज धाराशिव येथील राजवर्धन हंगरकेर हा छत्रपती संभाजी किंग्ज संघाचा आयकॉन खेळाडू असणार आहे.
दरम्यान संघात खेळाडूंच्या बोली कडून झालेल्या सिलेक्शन नंतर या संघात एकूण 22 खेळाडूंचा समावेश करण्यात आला असून, त्यातील 11 खेळाडू हे मराठवाड्यातील आहेत, हे विशेष!
संघातील सर्व खेळाडूंची आज धनंजय मुंडे यांनी पुण्यातील सहकार नगर भागातील शिंदे हायस्कुलच्या सराव मैदानावर भेट घेत शुभेच्छा दिल्या. तसेच खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी स्वतः धनंजय मुंडे यांनी नेट मध्ये खेळाडूंसह प्रॅक्टिसही केली.
असा आहे सीएसके (छत्रपती संभाजी किंग्स) संघ –
टीमचे नाव- छत्रपती संभाजी किंग (CSK)
फ्रेंचाईजी कंपनीचे नाव- व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ( VISPL)
1) राजवर्धन हंगेकर – राईट हॅन्ड फास्ट बॉलर – ओपनिंग बॉलर फिनिशनर – सीएसके इंडिया / अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप 2019 – धाराशिव
2) रामेश्वर दौंड – राईट हॅन्ड फास्ट बॉलर – ओपनिंग बॉलर – महाराष्ट्र अंडर 19 / 23 – जालना
3)आकाश जाधव – राईट हॅन्ड फास्ट बॉलर – मिडल ओव्हर बॉलर /ऑल राऊंडर – महाराष्ट्र अंडर 19/23 – जालना
4) मोहसीन सय्यद – लेफ्ट हॅन्ड फास्ट बॉलर – ओपनिंग बॉलर – महाराष्ट्र अंडर 25 – धाराशिव
5)जगदीश झोडगे – लेफ्ट आर्म स्पिन /लेफ्ट हॅन्ड बॅट –
ऑल राउंडर – रणजी / सय्यद मुस्ताक अली – जळगाव
6) हितेश वाळूज – लेफ्ट आर्म स्पिन / राईट हँड बॅट – ऑल राउंडर – रणजी / सय्यद मुस्ताक अली/ हायेस्ट विकेट टेकर फॉर महाराष्ट्र – पुणे
7 ) ऋषिकेश नायर – लेफ्ट आर्म स्पिन /लेफ्ट हॅन्ड बॅट – ऑल राउंडर – संभाजीनगर
8) स्वराज चव्हाण – लेग स्पिनर – टॅलेंडर – नांदेड
9)ओम भोसले – लेफ्ट हॅन्ड बॅट्समन – वन डाउन – महाराष्ट्र अंडर 25/ इंडिया अंडर 19 – पुणे
10) सामसुजमा काजी – राईट ऑफ स्पिन राईट हँड बॅट- फिनिशर ऑल राऊंडर – रणजी / सय्यद मुस्ताक अली – नांदेड
11) आनंद ठेंगे – राईट हॅन्ड फास्ट बॉलर – ओपनिंग बॉलर / फिनिशर – महाराष्ट्र अंडर ट्वेंटी 25/ हायेस्ट विकेटर – संभाजीनगर
12 ) मुर्तुजा ट्रंकवाला – राईट हॅन्ड बॅट्समन – ओपनिंग बॅट्समन – रणजी / मुस्ताक अली – नाशिक
13 )रंजीत निकम – राईट हॅन्ड बॅट्समन -मिडल ऑर्डर बॅट्समन – महाराष्ट्र अंडर 25 कॅप्टन – कोल्हापूर
14) अनिकेत नलवडे- राईट हॅन्ड बॅट्समन -मिडल ऑर्डर बॅट्समन – महाराष्ट्र अंडर 25 – कोल्हापूर
15) स्वप्निल चव्हाण – राईट हॅन्ड बॅट्समन – वन डाऊन- संभाजीनगर
16 ) हर्षल काटे – राईट हॅन्ड बॅट्समन – वन डाऊन- महाराष्ट्र अंडर 25 – पुणे
17) ओमकार खतापे – राईट हॅन्ड बॅट्समन – ओपनिंग बॅट्समन – हायस्ट रण गेटर एन इन्विटेशन मॅचेस – पुणे
18) ऋषिकेश दौंड – राईट हॅन्ड बॅट्समन -मिडल ऑर्डर बॅट्समन – महाराष्ट्र अंडर 19 – धाराशिव
19) आश्विन भापकर – राईट आर्म मीडियम फास्ट – मिडल ओव्हर बॉलर – पुणे
20) तनेश जैन – लेफ्ट आर्म स्पिन – ऑल राउंडर – महाराष्ट्र अंडर 25 – जळगाव
21) वरून गुजर – राईट हॅन्ड बॅट्समन/ विकेट किपर – मिडल ऑर्डर बॅट्समन – सातारा
22) सौरभ नवले – राईट हॅन्ड बॅट्समन/ विकेट किपर – ओपनिंग बॅट्समन – रणजी/ सय्यद मुस्ताक अली – बीड
23) अभिषेक पवार – राईट हॅन्ड बॅट्समन / विकेट किपर -मिडल ऑर्डर बॅट्समन – महाराष्ट्र अंडर 25 – धाराशिव
रिझर्व
निशांत नगरकर
कुणाल कोठावळे
अभिषेक ताटे