छत्रपती शिवाजी महाराजही ओबीसी होते; महादेव जानकरांचं वक्तव्य

परभणी – राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत येत असतात. आता जानकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या एका  वक्तव्याची सध्या बरीच चर्चा होताना दिसून येत आहे. महादेव जानकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजही ओबीसी होते असं वक्तव्य केलं आहे.

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमध्ये आयोजित कार्यक्रमात महादेव जानकर यांनी उपस्थिती लावली, यावेळी त्यांनी मराठा, ओबीसी आरक्षणावरुन राज्य सरकारवर टीका केली. इतकंच नाही तर आमदार म्हणून निवडून देण्याचं आवाहन करताना मराठा, मुसलमान, ओबीसी सगळ्यांना आरक्षण देतो असं आश्वासन दिलं.

“मराठा समाजाला माझा विनंती आहे. शाहू महाराजांनी या देशात आरक्षण दिलं. मराठ्यांना आरक्षण होतं, पण नंतर आरक्षण का गेलं? शिवाजी राजादेखील ओबीसी होता. कुळवाडी भूषण राजा होता. आमच्यातल्या तथाकथित लोकांना वाटलं, आम्ही लय मोठं हाय गावचं, आम्हाला नको तसलं आरक्षण आणि आज अवस्था काय झाली आहे?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.