छत्रपतींचा स्वराज्याचा लढा हिंदू- मुस्लिम असा नव्हताच – राजू पुरुळेकर 

मुंबई – जेष्ठ पत्रकार राजू पुरुळेकर (Raju Purulekar) हे सोशल मिडीयावर (Social media)चांगलेच सक्रीय असतात. बऱ्याचदा त्यांनी केलेल्या सोशल मिडीयावर केलेल्या पोस्ट्सची चांगलीच चर्चा होत असते. नुकतेच त्यांनी एक ट्वीट केले असून या ट्वीटची सध्या बरीच चर्चा होताना दिसून येत आहे.  हे ट्वीट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत असल्याने अनेकांनी  यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

राजू पुरुळेकर या ट्वीटमध्ये म्हणतात,  छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) विश्वासू अंगरक्षक सिद्दी इब्राहिम (Siddi Ibrahim) हा मुस्लिम होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा कावा करुन स्वराज्यात विध्वंस करत आलेल्या अफ़ज़लखानाचा वकील मात्र कृष्णाजी भास्कर कुलकर्णी (Krishnaji Bhaskar Kulkarni) हा होता. त्यामुळे छत्रपतींचा स्वराज्याचा लढा हिंदू- मुस्लिम असा नव्हताच. असं त्यांनी म्हटले आहे.

या ट्वीटवर आलेल्या काही प्रतिक्रिया पाहूयात