Chief Justice Chandrachud | आपल्या देशात मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थ खाणाऱ्या लोकांमध्ये गेल्या काही वर्षांत बरेच लोक ‘व्हीगनिज्म’कडे वळले आहेत. सोशल मीडियावर व्हीगन डायट खाण्याचे फायदे आणि तोटे तुम्ही दररोज वाचत असाल. दरम्यान, देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हेही व्हीगन झाले आहेत. याचा अर्थ असा आहे की खाद्यपदार्थांच्या वादविवादांमध्ये, व्हीगन समर्थकांची आघाडी थोडी मजबूत झाली आहे. चंद्रचूड यांनी सांगितले की, आपल्या मुलीकडून प्रेरणा घेऊन आपण या दिशेने वळलो आहे.
व्हीगन लोक शाकाहारापासून एक पाऊल पुढे जातात आणि कोणत्याही प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ खात नाहीत. आणि रेशीम, चामडे किंवा प्राण्यांवर चाचणी केलेले कोणतेही उत्पादन वापरत नाहीत.
5 जुलै रोजी न्यायमूर्ती चंद्रचूड (Chief Justice Chandrachud) दिल्ली उच्च न्यायालयाच्या परिसरात एका रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. येथेच त्यांनी या गोष्टी सांगितल्या. हे रेस्टॉरंट पूर्णपणे दिव्यांग लोकांसाठी चालवले जाईल. CJI चंद्रचूड म्हणाले की त्यांच्या मुलीने त्यांना “क्रूरतामुक्त जीवन” जगण्यास सांगितले आणि म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला.
सरन्यायाधीशांचा दावा आहे की ते किंवा त्यांची पत्नी यापुढे रेशीम किंवा चामड्याच्या वस्तू खरेदी करणार नाहीत. त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे आधीपासून असलेल्या अशा वस्तू ते फेकून देऊ शकत नाही, परंतु किमान ते व्हीगन जीवनशैलीच्या दिशेने हे पहिले पाऊल मानतात
त्यांनी सांगितले, “मला दोन मुली आहेत त्या अपंग आहेत. त्या दोघी मी जे काही करतो त्यात मला प्रेरणा देतात. अलीकडे मी व्हीगन होण्याचा निर्णय घेतला कारण माझ्या मुलीने सांगितले की आपण क्रूरतामुक्त जीवन जगले पाहिजे.”
सरन्यायाधीश पुढे म्हणाले की, त्यांनी सर्वप्रथम दुग्धजन्य पदार्थ आणि मध सोडून पूर्णपणे व्हीगन आहार स्वीकारून याची सुरुवात केली. मात्र हे पुरेसे नसल्याचे त्यांच्या मुलींनी सांगितले. प्राण्यांपासून बनवलेले कोणतेही पदार्थ वापरणे बंद करण्याचा सल्ला मुलींनीच दिला.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप