भाजपा, मनसे, राणा दाम्पत्य…  ढाण्या वाघाच्या निशाण्यावर नेमकं कोण असणार ? 

मुंबई : हिदुत्वांचा हुंकार ऐकायला यायला पाहिजे, असं म्हणत शिवसेनेने (shivsena) कार्यकर्त्यांना साद घातली आहे. आज  मुंबईतील बीकेसी मैदानात (BKC ground)  शिवसेना शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS president Raj Thackeray)  आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे.

गेल्या दोन महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा घेत महाविकास आघाडी आणि खास करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. महापालिकेत सुरु असलेला भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपनेही पोलखोल सभा घेत शिवसेनेविरोधात रणशिंग फुकलं आहे. या सगळ्यावर उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि  शिवसेना सज्ज झाली आहे.

राज ठाकरे, देवेद्र फडणवीस, नवनीत राणा आणि रवी राणा, केद्र सरकार, महागाई, केंद्रीय यंत्रणा , आगामी निवडणुका याबाबत ते भाष्य करतील अशी शक्यता आहे. याशिवाय पक्षाची आगामी काळातील वाटचाल कशी असेल याबाबत देखील उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील.असं देखील सांगण्यात येत आहे.