ज्येष्ठ शिवसैनिक गुलाबराव ढवळे यांना मुख्यमंत्र्यांची मदत; मूत्रपिंड विकारावरील उपचारांच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारली

पुणे :- कसबा विधानसभा क्षेत्रात प्रचारासाठी फिरत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज जुने आणि ज्येष्ठ शिवसैनिक गुलाबराव कोंडीबा ढवळे (Gulabrao Dhavle) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना वैद्यकीय मदत करण्याची जबाबदारी स्वीकारली.

गुलाबराव ढवळे हे सध्या मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याची गरज आहे. आज त्यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्यावरील संपूर्ण उपचारांची जबाबदारी देखील शिवसेनेच्या वतीने उचलण्यात येईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार प्रवीण दरेकर आणि शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के तसेच युवासेना सचिव किरण साळी आणि युवासेना शहरप्रमुख उमेश गिरमे तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.