चिंचवडच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून ‘या’ नेत्याला मिळाली उमेदवारी

Nana Kate : चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Nana Kate has been nominated by NCP in Chinchwad by-election.). राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. भाजपकडून अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता अश्विनी जगताप विरूद्ध नाना काटे असा सामना होणार आहे.

“चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील.महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे”, असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान, पुण्यातल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. काल त्यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांनाही काल भाजपाचे वरिष्ठ नेते आणि अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनीही काल उमेदवारी अर्ज भरला.