अशोक गावडेची जीभ छाटा.. राष्ट्रवादीचा नवी मुंबईचा हा हरामखोर जिल्हाध्यक्ष….कुठल्या मस्तीतं आहे ?

नवी मुंबई –  नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांची जीभ घसरली असून अमृता फडणवीस यांचाआक्षेपार्ह शब्दाचा उल्लेख त्यांनी भाषणात केला आहे. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवाब मालिकांच्या ईडीने केलेल्या कारवाईविरोधात आंदोलन चालू असताना आपल्या भाषणात त्यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत. विशेष म्हणजे या वाचाळवीर नेत्याला आपण महिलांचा कायम सन्मान करण्याची शिकवण देणाऱ्या शिवरायांच्या नावाने असणाऱ्या चौकात भाषण करत आहोत याचे देखील भान राहिले नसल्याचे दिसत आहे.

“आमच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पत्नी अशा पध्दतीने कोठेही टीका करत नाही. परंतु ही डान्सबारमधली मात्र रस्त्यावर येऊन बोलते”, असे आक्षेपार्ह वक्तव्य गावडे यांनी केले. मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या धर्मपत्नीने कशा प्रकारचे वक्तव्य केले पाहिजे असेही ते म्हणाले.या आंदोलनावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

दरम्यान, गावडे यांनी हे आक्षेपार्ह विधान केल्याने नवी मुंबई भाजपकडून अशोक गावडे यांचा निषेध केला जात आहे. भाजपच्या धडाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी गावडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या, अशोक गावडे ची जीभ छाटा..राष्ट्रवादीचा नवी मुंबईचा हा हरामखोर जिल्हाध्यक्ष….कुठल्या मस्तीतं आहे. अमृता फडणविसांचा ज्या निचमनोवृत्तीने उल्लेख याने केला हे राष्ट्रवादीला मान्य आहे का..? आणि यात कुणालाही महिलांचा अपमान विनयभंग दिसत नाही? नवी मुंबई पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा असं वाघ यांनी म्हटले आहे.