औरंगजेबाचं प्रेम उफाळून आलेल्यांना पाकिस्तानचा रस्ता दाखवायलाच पाहीजे – चित्रा वाघ

मुंबई – काही संघटनांनी आक्षेपार्ह स्टेटसच्या विरोधात काल कोल्हापूर बंदची हाक दिली होती. यादरम्यान काही परिसरात तणाव निर्माण झाला. जमावानं वाहनांची तोडफोड केली. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधूर सोडला. सोशल मीडियावरून कोणतीही आक्षेपार्ह माहिती पसरु नये, यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं मोबाईल कंपन्यांना दिले आहेत.

दरम्यान, कोल्हापूर शहरातील तणावाची परिस्थिती आता नियंत्रणात असून नागरिकांनी सोशल मिडियाव्दारे पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलं आहे. जिल्ह्यात येत्या 19 जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश आहेत.

एका बाजूला प्रशासन शांतता राखण्याचे प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला राजकीय आरोप प्रत्यारोप काही थांबत नसल्याचे चित्र आहे. यातच आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या देखील प्रतिक्रिया समोर येत आहे. त्या म्हणाल्या, हे औरंग्याच्या कबरीवर फुलं उधळणारं फितुर ठाकरे सरकार नाही हे लक्षात ठेवावं तर थेट कारवाई करणारं शिंदे – फडणवीसांचं सरकार आहे..

औरंगजेबाचं प्रेम उफाळून आलेल्यांना पाकिस्तानचा रस्ता दाखवायलाच पाहीजे… अशा प्रकारचं स्टेटस ठेवून सलोख्याचं वातावरण बिघडवणाऱ्यांचा हेतू स्वच्छ दिसत नाही..काही दुष्ट प्रवृत्तींना राज्यात दंगे घडवायचे आहेत त्यांचा बंदोबस्त करायला शिंदे – फडणवीस सरकार सक्षम आहे..असं वाघ यांनी म्हटले आहे.