लाडकी बहिण योजनेत महिलांना फसवण्याचा प्रयत्न, Chitra Wagh यांचा महाविकास आघाडीवर आरोप

लाडकी बहिण योजनेत महिलांना फसवण्याचा प्रयत्न, Chitra Wagh यांचा महाविकास आघाडीवर आरोप

Chitra Wagh, Ladki Bahin Yojana :- राज्यात सध्या लाडकी बहिण (Majhi Ladki Bahin Yojana) योजनेवरुन राजकारण सुरू आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा करत महिला दरमहा 1500 रुपये देण्याचे जाहीर केले. परंतु महाविकास आघाडीचे नेते या योजनेतील त्रुटी काढत सातत्याने राज्य सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. दरम्यान भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एक व्हिडिओ शेअर करत महिलांना आवाहन केले आहे.

 चित्रा वाघ म्हणाल्या की, माझी लाडकी बहिण योजना जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसनं ही योजना फसवण्याचा कट आखला आहे.

त्यांच्या शिबिरांमध्ये जे अर्ज भरुन घेतलं जातील त्यामध्ये ते कशा पद्धतीने त्रुटी राहतील याची काळजी ते घेणार आहेत. त्यामुळे काय होणार आहे की, माझ्या माता भगिनींना पैसे मिळणार नाही आहेत. ही योजना आणि त्याचबरोबरीने महायुती सरकारला बदनाम करण्याचा त्यांचा हेतू आहे त्यांचा डाव आहे. अर्जात त्रुटी ठेवायच्या आणि नंतर योजना कशी फसवी आहे याची बोंब मारायची हे त्यांनी ठरवलं आहे.

यासोबतच त्या म्हणाल्या की, म्हणून मला माझ्या माता भगिनींना सांगायचं आहे की, त्यांच्या शिबिरातून अर्ज नक्की घ्या पण अर्ज घेतल्यावर स्वत:हा अॅपवर जाऊन, सेतूकेंद्रावर जाऊन, वेबसाईटवर जाऊन अपलोड करा आणि त्याची पावती घ्यायला विसरु नका. ही योजना तुमच्यासाठी तुमच्या युती सरकारने आणली आहे. त्यामुळे इतरांची दुकानं अजिबात चालू देऊ नका. असे चित्रा वाघ म्हणाल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Nana Patole | आरक्षणप्रश्नी महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नाही

Nana Patole | आरक्षणप्रश्नी महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नाही

Next Post
Worli hit and run : आरोपी मिहिर शहाच्या वडिलांवर शिवसेनेची कारवाई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कठोर निर्णय

Worli hit and run : आरोपी मिहिर शहाच्या वडिलांवर शिवसेनेची कारवाई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कठोर निर्णय

Related Posts
हार्दिकच्या नेतृत्त्वाखालील मुंबईच्या अडचणी वाढणार, Suryakumar आयपीएलला मुकण्याची शक्यता

हार्दिकच्या नेतृत्त्वाखालील मुंबईच्या अडचणी वाढणार, Suryakumar आयपीएलला मुकण्याची शक्यता

Suryakumar Yadav and Mohammed Shami: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाला मोठा धक्का बसणार आहे. अनुभवी स्टार…
Read More

महिला प्रत्येक क्षेत्रात आल्यास भारत देश प्रगतीपथावर जाईल – कपिल देव

पूणे – भारत देशातील महिला या खूप मेहनती ,कर्तुत्ववान आहेत त्यांच्याकडे  विविध प्रकारची गुणवत्ता आहे त्या जर विविध…
Read More
rohit pawar - modi

‘देश जेव्हा एकाच व्यक्तीच्या विचाराने चालतो तेव्हा त्याचे गंभीर दुष्परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतात’

अहमदनगर : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले करण्यात येत आहेत.…
Read More