चित्रपटगृह आणि नाट्यगृहातही आता 100 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीस परवानगी

 चित्रपटगृह आणि नाट्यगृहातही आता 100 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीस परवानगी

पुणे  : जिल्ह्यातील कोविड संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात असल्याने येत्या 1 डिसेंबरपासून कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी आणि चित्रपटगृह तसेच नाट्यगृहात 100 टक्के प्रेक्षक क्षमतेलाही परवानगी देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार गिरीष बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, राज्यातील कोविड परिस्थीती नियंत्रणात असल्याने 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यात येत आहेत. त्याप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांनाही परवानगी देण्यात येईल. मात्र कोविडचा धोका अद्यापही पूर्णपणे टळला नसल्याने नागरिकांना मास्क घालणे आणि कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. जगातील इतर देशात पसरणाऱ्या नव्या कोविड व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेण्यात यावी.

कोविड लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांनाच विमान प्रवासाची अनुमती असल्याने देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पुणे विमानतळावर तपासणी करण्यात येऊ नये. नवा व्हेरीयंट आढळलेल्या देशातून येणाऱ्या प्रवाशांबाबत केंद्र सरकारच्या सूचनेनुसार निर्णय घेण्यात येईल. नुकतेच झालेले सण-उत्सव आणि नव्या व्हेरियंटचा धोका पाहता जम्बो कोविड हॉस्पिटलबाबत डिसेंबरअखेर निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

लस न घेणाऱ्या नागरिकांच्या प्रबोधनावर भर द्यावा. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आगीच्या घटना टाळण्यासाठी व आपत्कालीन परिस्थीत तातडीने कार्यवाही करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण द्यावे, असेही पवार म्हणाले.

विभागीय आयुक्त श्री.राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्याने कोविड लसीकरणाचा 1 कोटी 30  लक्षचा टप्पा पार केला असून लसीरणात पुणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘हर घर दस्तक’ मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 431 गावात 100 टक्के पहिल्या मात्रेचे लसीकरण पूर्ण झाले आहे.  लसीकरणात वाढ झाल्याने रुग्णसंख्या व मृत्यूच्या संख्येत घट झालेली आहे. 97 टक्के नागरिकांना लशीची पहिली मात्रा तर 62 टक्के नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 1.6 पर्यंत कमी झाला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस आमदार सुनिल टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, राहुल कुल, दिलीप मोहिते, अशोक पवार, सुनिल कांबळे, पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

https://www.youtube.com/watch?v=49NUse5VrPE&t=50s

Previous Post
'बाबासाहेबांचे आमच्या घराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते, त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकणे, हा विलक्षण अनुभव होता'

‘बाबासाहेबांचे आमच्या घराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते, त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकणे, हा विलक्षण अनुभव होता’

Next Post
लातूर जिल्हा कृषी विकास केंद्र म्हणून नावारूपाला आणण्यासाठी पायाभ्रूत सुविधा ऊभारणीवर भर देणार

लातूर जिल्हा कृषी विकास केंद्र म्हणून नावारूपाला आणण्यासाठी पायाभ्रूत सुविधा ऊभारणीवर भर देणार

Related Posts
मदरशांमध्ये शिकणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप रद्द, केंद्राचा मोठा निर्णय

मदरशांमध्ये शिकणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप रद्द, केंद्राचा मोठा निर्णय

नवी दिल्ली – केंद्र सरकारने मदरशांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद केली आहे. त्याबाबत सूचनाही…
Read More
“प्रत्येकजण मरायला आलाय”, सुनील शेळकेंचा विरोधकांना इशारा | Sunil Shelke

“प्रत्येकजण मरायला आलाय”, सुनील शेळकेंचा विरोधकांना इशारा | Sunil Shelke

Sunil Shelke | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यात सक्रिय झाले आहेत. ते सातत्याने राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचे…
Read More
Zaheer Khan | झहीर खान घेणार गौतम गंभीरची जागा, आयपीएलमध्ये या फ्रँचायझीकडून मिळालीय मोठ ऑफर!

Zaheer Khan | झहीर खान घेणार गौतम गंभीरची जागा, आयपीएलमध्ये या फ्रँचायझीकडून मिळालीय मोठ ऑफर!

Zaheer Khan | गौतम गंभीर सध्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. यापूर्वी, गंभीर आयपीएल 2024 मध्ये…
Read More