शिवसेनेत धुसफूस वाढली; महिला शिवसैनिकांकडून शहरप्रमुखाला कपडे फाटेपर्यंत  मारहाण

भाईंदर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे राज्याचे कारभारी झाले असल्याने पक्षात दुर्लक्ष होत असल्याचं सांगितले जात आहे. यामुळे पक्षात यादवी माजत चालल्याचे चित्र आहे.   शिवसेना (shivsena) शाखेतच शहरप्रमुखाला महिला शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भाईंदर पश्चिमचे शहरप्रमुख पप्पू भिसे (Pappu Bhise) काल  दुपारी पोलिस ठाण्याच्या समोर असणाऱ्या शिवसेनेच्या शाखेत बसले होते. येथील काही जणांचा पक्षप्रवेश शिवसेनेचे संपर्कप्रमुख, आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Saranaik) यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. शिवसेनेच्या माजी महिला शहर संघटक वेदाली परळकर (Vedali Paralkar) यांना याचा राग आला होता.

यानंतर शहरप्रमुख भिसे शाखेत बसलेले असताना परळकर सात ते आठ महिलांसह शाखेत आल्या होत्या. पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आपल्याला न सांगता कसा केला, असे विचारून परळकर आणि इतर महिलांनी त्यांना मारहाण केली. या वेळी कपडेही फाडण्यात आले, तसेच काळे फासण्याचाही प्रयत्न झाला.

दुसरीकडे वेदाली परळकर यांनीही पप्पू भिसे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार (Report to police station) दाखल केली आहे. महिला बचत गटाच्या कामानिमित्त काही महिला भेटण्यासाठी येणार असल्यामुळे परळकर शाखेत गेल्या होत्या. भिसे हे त्या आल्याचे पाहून बाहेर गेले होते, त्यामुळे त्या त्यांच्या खुर्चीवर बसल्या. या गोष्टीचा राग आल्यामुळे भिसे यांनी आपल्याला शिवीगाळ केली आणि विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम. बी. पाटील (Senior Inspector of Police M. B. Patil) यांनी दिली.