राहुल गांधी यांच्याविरोधात पुणे न्यायालयात दावा, सावरकर कुटुंबियांची बदनामीची तक्रार

पुणे – काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul gandhi) हे स्वातंत्र्यवीर सावरकर (swatantryveer savarkar)यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्ये करून नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. एकप्रकारे त्यांना ही चटकच लागली आहे. मात्र आता त्यांना त्यांची ही चटक महागात पडू शकते. राहुल गांधी यांच्या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर (satyaki Savarkar) यांनी दावा दाखल केला आहे.

मानहानीचा दावा दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. खासदारकी रद्द करण्यात आल्याने राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केंद्रातील सरकारवर हल्लाबोल केला होता. यावेळी मी सावरकर नाही तर राहुल गांधी आहे…त्यामुळं माफी मागणार नाही, असं म्हणत राहुल गांधींनी टीका केली होती. 15 एप्रिल रोजी पुणे न्यायालयात या दाव्यावर सुनावणी होणार आहे. यामुळे राहुल गांधी यांच्यासमोर अडचणी वाढताना दिसत आहेत.

इंग्लंड येथील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी खोटी माहिती देऊन त्यांचा अपमान केला. सावरकर यांच्याविषयी मते कलुषित करण्याच्या दृष्टीने आणि बदनामी करण्यासाठी राहुल गांधी यांनी अपमानजनक वक्तव्य केले आहे. त्याची शिक्षा मिळावी यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय आम्ही कुटुंबीयांनी घेतला असल्याचे सात्यकी सावरकर यांनी सांगितले.