‘या’ पद्धतीने लागवड करून गवार पिकातून घ्या लाखोंचे उत्पादन !

gavar

पुणे : गवार ही शेंगवर्गीय भाजी असून कोवळ्या शेंगाची भाजीसाठी उपयोग केला आजतो तर सुकलेल्या बियांचा उसळ म्हणून उपयोग केला जातो. ग्रामीण भागात हे अतिशय लोकप्रिय पिक आहे. महाराष्ट्रामध्ये अंदाजे ८९१० हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड होते. गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश हे जनावरासाठी हिरवा चारा हिरवळीचे खत म्हणून वापरले जाते. गवारीच्या पिकापासून निघणारे डिंक याला मोठी मागणी असल्यामुळे परकीय चलन मिळूवून देणारे पिक म्हणून याकडे पहिले जाते.

गवारीच्या शेंगामध्ये फाँस्फरस, चुना, लोह इत्यादी खनिजे आणि अ, ब, क जीवनसत्वे बरयाच प्रमाणात असतात. गवारीच्या डिंकाचा कागद, कापड, सौंदर्य प्रसाधने आणि स्फोटकात उपयोग केला होतो.

हवामान आणि जमीन

गवार हे उष्ण हवामानातील पिक असून सरासरी १८ ३० अंश सेल्सिंअस तपमानास हे पिक उत्तम येते. खरीपातील उष्ण व दमटहवेमुळे झाडांची वाढ चांगली होते. हिवाळी हंगामात या पिकांची लागवड फायदेशीर ठरत नाही. हे पिक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते. उत्तम पाण्याचा चांगला निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत या पिकाची वाढ चांगली होते. जमिनीचा सामू ७.५ ते ८ च्या दरम्यान असल्यास पिकाची वाढ चांगली होते.

लागवड हंगाम

गवारीची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात केली जाते. उन्हाळी हंगमास गवारीची लागवड जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात करतात. बियांचे प्रमाण हेक्टरी १४ ते २४ किलो बी लागवडीस पुरेसे असते. बियाण्यास पेरणीपूर्व १० ते १५ किलो बियाण्यात २५० ग्रॅम रायझोबियम चीलावे.

पूर्वमशागत

जमिनीची प्रत व हवामानानुसार दोन ओळीतील अंतर ४५ ते ६० सेंमी ठेवावे आणि झाडातील अंतर २० ते ३० सेंमी ठेवावे. काही शेतकरी ४५ सेंमी पाभारणे बी पेरून नंतर सारा यंत्राने सारे पडतात किंवा ४५ X ६० सेंमी अंतरावर स-या पडून सरीच्या दोन्ही बाजून दोन झाडातील अंतर १५ ते २० सेंमी राहील या अंतरावर दोन दोन बिया टोकतात.

खते व पाणी व्यावस्थापन

गवार हे शेंगवर्गातील कोरडवाहू म्हणून पिक घेतल्यास त्यास खताची फारशी जरुरी भासत नाही. बागायती पिकास लागवडीपूर्वी ५० किलो नत्र, ६० किलो पालाश द्यावे.

जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे. या पिकला पाणी माफक प्रमाणत लागते परंतु फुलाखोंचेले आल्यापासून शेंगाचा बहार पुरण होइपर्यत नियमित पाणी द्यावे.

आंतरमशागत

पेरणीनंतर १० ते २० दिवसांनी रोपांची विरळणीकरून जोमदार व उत्तम वाढीतील अशा अंतराने रोपे ठेवावीत. ३ आठवड्यांनी खुरपणी करून तण काढून टाकावेत. दुसरी खुरपणी तणांचे प्रमाण पाहून करावी.

वाण

पुसा सदाबहार – ही सरळ व उंच वाढणारी जात असून उन्हाळी व खरीप हंगामासाठी शिफारस केलेली आहे. या जातीच्या शेंगा १२ ते १५ सेंमी लांब असून शेंगा हिरव्या, कोवळ्या व बिन रेषांच्या असतात. शेंगाची काढणी ४५ ते ५५ दिवसांनी सुरु होते.

पुसा नावबहार – ही जात उन्हाळी व खरीप या दोन्ही हंगामात चांगले उत्पादन देते. शेंगा १५ सेंमी लांब कोवळ्या हिरव्या रंगाच्या असतात. झाडांची सरळ वाढ होते. पानाच्या बोचक्यात शेंगाचा घोस असतो.

पुसा मोसमी – ही अधिक उत्पादन देणारी जात खरीप हंगामासाठी चांगली असून या जातीच्या शेंगा १० ते १२ सेंमी लांब असून ही जात ७५ ते ८० दिवसात काढणीस सुरु होते. शेंगा आकर्षक चमकदार, हिरव्या रंगाच्या असतात. या जातीत फांद्या अधिक प्रमाणात फुटून मुख्य खोड आणि फांद्याच्या टोकावर शेंगा येतात.

शरद बहार – या जातीचे झाड उंच असून झाडाला १० ते १४ फांद्या असतात. शेंगा आकर्षक मऊ, रशरशीत, लांब असतात. ही जात खरीप हंगामासाठी योग्य आहे.

कीड व रोग

भुरी – हा बुरशीजन्य रोग असून पानाच्या दोन्ही बाजूवर कळपात डागांनी होऊन नंतर संपूर्ण पान पांढरे होते. हा रोग खोड आणि शेंगावरही पसरतो.

उपाय – ५०% ताम्रयुक्त औषध काँपर ऑक्झीक्लोराईड २५ ग्राँम १० लिटर पाण्यात मिसळून ८ ते १० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवाऱण्या काराव्यात.

मर – हा बुरशीजन्य रोग असून या रोगाची लागण झालेले झाड कोलमडून जाते. प्रथमत: झाद्पिवले पडते व बुन्ध्याजवळ अशक्त बनते.

उपाय – बियाणास प्रति किलो ४ ग्रॅम थायरम चोळावे. रोगट झाडाभोवती बांगडी पद्धतिने तम्ब्रयुक्त औषधाचे द्रावण ८ ते १० सेंमी खोल माती भिजेल असे ओतावे.

कीड – या पिकावर मावा व तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव होतो.

उपाय – या किडीच्या नियत्रनासाठी पिकावर डायमेथोएट ३० ईसीक१.५ मिली किंवा मोनोक्रोटोफाँस ३६ डब्लूसी किंवा मिथिलडिमेटाँन २५ ईसी २ मिली प्रतिलिटरपाण्यात मिसळून फावरावे.

काढणी व उत्पादन

भाजीसाठी हिरव्या कोवळ्या पण पूर्ण वाढलेल्या शेंगाची नियमित तोडणी करावी. शेंगा जास्त दिवस झाडावर राहिल्यास त्यात रेषांचे प्रमाण वाढते आणि साल कठीण होऊन त्या लवकर शिजत नाहीत. शेंगाची तोडणी ३ ते ४ दिवसांतून करावी. सर्व साधारणपणे हिरव्या शेंगाचे हेक्टरी १०० ते २०० क्विंटल उत्पादन मिळते.

Previous Post
Nitin Gadkari

नितीन गडकरींचा आणखी एक मास्टर स्ट्रोक, ‘या’ महामार्गासाठी देणार ५ हजार कोटी

Next Post
varsha gaikwad

फी साठी तगादा लावणाऱ्या शाळांवर तातडीने कारवाई करा, युवसेनेची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

Related Posts
ठाकरेंनी राजीमाना दिला नसता तर आम्ही परिस्थिती पूर्ववत करू शकलो असतो - SC 

ठाकरेंनी राजीमाना दिला नसता तर आम्ही परिस्थिती पूर्ववत करू शकलो असतो – SC 

Maharashtra Political crisis –   महाराष्ट्र आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विरुद्ध उद्धव…
Read More
नागालँड विधानसभेत रिपब्लिकन पक्ष खाते उघडणार; रामदास आठवले यांनी व्यक्त केला विश्वास 

नागालँड विधानसभेत रिपब्लिकन पक्ष खाते उघडणार; रामदास आठवले यांनी व्यक्त केला विश्वास 

दिमापूर – नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे 8 उमेदवार निवडणूक रिंगणात कडवी लढत देत…
Read More