CM Eknath Shinde | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत

CM Eknath Shinde | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत

CM Eknath Shinde | डोंबिवली (घेसरगाव) येथून खाजगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दि. 15 जुलै रोजी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातातील मृत व्यक्तींना शासनातर्फे 5 लाख रुपये मदत देण्याचे आणि जखमींवर शासनातर्फे मोफत उपचार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज जाहीर केले.

कळंबोली नवीमुंबई येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट देऊन जखमींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. शासन आपल्या पाठीशी असल्याचे रुग्णांना सांगितले. जखमींवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी उपचाराबाबत अधिक माहिती जाणून घेतली. अतीदक्षता विभागात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांना अधिक उपचारासाठी अन्य रुग्णालयात स्थलांतरीत करावे लागल्यास तसे करावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
खाजगी बस आणि ट्रॅक्टर यांच्या मध्ये झालेल्या अपघातात 46 जखमी आहेत. त्यापैकी 7 वारकरी गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतीदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

मुख्यमंत्र्यांनी झालेल्या अपघाताची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune News | फोडाफोडीला झाली सुरुवात; अजित पवारांच्या विश्वासू नेत्याने केला शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

Eknath Shinde | लाडक्या बहिणीनंतर लाडक्या भावासाठीही आली योजना, दरमहा मिळणार 6-10 हजार?

Chhagan Bhujbal | अतिरिक्त रोहित्रांच्या माध्यमातून शेतकरी व ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत होणार

Previous Post
Rajguru Paramhansa Acharya | सत्तेच्या लालसेपोटी बाळासाहेबांचे विचार सोडून उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले

Rajguru Paramhansa Acharya | सत्तेच्या लालसेपोटी बाळासाहेबांचे विचार सोडून उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले

Next Post
Ishan Kishan | टीम इंडियात पुनरागमन व्हावे म्हणून इशान किशनचे देवाकडे साकडे? साईबाबांच्या चरणी झाला लीन

Ishan Kishan | टीम इंडियात पुनरागमन व्हावे म्हणून इशान किशनचे देवाकडे साकडे? साईबाबांच्या चरणी झाला लीन

Related Posts
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजितदादांना दिलासा; इनकम टॅक्स विभागाने जप्त केलेली मालमत्ता झाली मुक्त | Ajit Pawar

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजितदादांना दिलासा; इनकम टॅक्स विभागाने जप्त केलेली मालमत्ता झाली मुक्त | Ajit Pawar

Ajit Pawar : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवारांना (Ajit Pawar) न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.…
Read More
केवळ खाण्याच्या वाईट सवयीच नव्हे तर स्वयंपाकघरातील 'या' वस्तूही तुम्हाला पाडू शकतात आजारी

केवळ खाण्याच्या वाईट सवयीच नव्हे तर स्वयंपाकघरातील ‘या’ वस्तूही तुम्हाला पाडू शकतात आजारी

कोणत्याही रोगापासून बचाव करताना केवळ आहार आणि व्यायामाकडे लक्ष दिले पाहिजे, असे नाही तर घराची स्वच्छता आणि घरात…
Read More

काँग्रेस नेहमीच जनतेचा आवाज बनेल : मायकल लोबो

पणजी : गोव्यातील जनतेचा नेहमीच आवाज बनून राहणार असे आश्वासन देत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते मायकल लोबो यांनी…
Read More