मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आईची घेतली भेट

पाचूर  –  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(cm yogi adityanath) उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपली आई सावित्री यांची आपल्या गावी पाचूर येथे भेट घेतली. या दरम्यान, योगी यांनी चरणस्पर्श करून आईचे आशीर्वाद घेतले. यासोबतच त्यांनी त्यांच्या घरातील इतर सदस्यांचीही भेट घेतली.

आईसोबतच्या भेटीदरम्यान सीएम योगींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता, त्याचवेळी इतक्या वर्षांनी मुलाला भेटल्याने त्यांची आईही खूप आनंदी दिसली. दरम्यान, योगींनी एका कार्यक्रमात भाग घेतला आणि तेथे त्यांचे गुरू महंत अवद्यनाथ (Guru Mahant Avadyanath) यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री योगी आपल्या गुरूंचे स्मरण करून भावूक झाले.

यावेळी ते म्हणाले,आज मला माझ्या गुरूंचा आदर करण्याचे सौभाग्य मिळाले. 35 वर्षांनंतर मी माझ्या शिक्षकांना भेटू शकलो आहे. मी आज जो काही आहे ते माझे आई-वडील आणि गुरू अवेद्यनाथ यांच्यामुळेच आहे, असही योगी म्हणाले आहेत.