मुंबई | मुंबई विमानतळावर धक्कादायक (Mumbai Cocaine seized ) प्रकार उघडकीस आला आहे. युगांडाहून मुंबईत दाखल झालेल्या एका परदेशी प्रवाशाच्या पोटात तब्बल 7 कोटी 85 लाख रुपयांचे कोकेन आढळले असून, सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली आहे.
या परदेशी प्रवाशाची तब्येत बरी नसल्याचे निरीक्षण अधिकाऱ्यांनी विमानतळावरच केले. त्यानंतर साशंकतेतून चौकशी केली असता, त्याने पोटात कोकेन भरलेल्या कॅप्सूल्स गिळल्याची कबुली दिली. वैद्यकीय तपासणीत त्याच्या पोटात 785 ग्रॅम कोकेन असल्याचे स्पष्ट झाले.
कोकेन छोट्या कॅप्सूलमध्ये भरून त्या गिळण्याची पद्धत अनेक तस्कर वापरत (Mumbai Cocaine seized ) असतात. मात्र, ही पद्धत अत्यंत धोकादायक असून, कॅप्सूल फुटल्यास जीवावर बेतण्याची शक्यता असते.
सीमा शुल्क विभागाने या तस्कराविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे अंमली पदार्थ तस्करीसाठी वापरले जाणारे नवे मार्ग आणि तंत्र पुन्हा एकदा समोर आले आहेत.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
मेहुल चोक्सीच्या अटकेवर खासदार सुप्रिया सुळे यांची लक्षवेधी प्रतिक्रिया
पश्चिम बंगाल वक्फ कायदा विरोधातील हिंसाचार प्रकरणात अटक संख्या 150 वर
पुढे कोणतीही तनिषा भिसेसारखी घटना घडू नये यासाठी पावले उचलणार – Rupali Chakankar