अर्धवट राष्ट्रगीत गायल्याने ममता बॅनर्जींविरोधात पोलिसात तक्रार

अर्धवट राष्ट्रगीत गायल्याने ममता बॅनर्जींविरोधात पोलिसात तक्रार

मुंबई – मुंबई दौऱ्यावर असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्याची सध्या बरीच चर्चा होताना पाहायला मिळत आहे. ममता यांचा हा दौरा आता काहीसा वादग्रस्त देखील बनू लागला आहे.कारण ममता यांच्यावर मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुंबई भाजपा नेत्यांनी ममता यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी भाजपा नेत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ममता यांनी बसून राष्ट्रगीत गायले आणि ते पूर्ण न करता २-४ ओळी गायल्या नंतर बंद केले, असा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. एकतर त्या राष्ट्रगीत बसून म्हणाल्या इतकंच नाही तर राष्ट्रगीत अर्धवट म्हणत उठल्या. या अवमानासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. शेवटी राष्ट्राभिमान महत्वाचा आहे, परंतु देशाभिमानापेक्षा त्यांना राजकारण मोठे वाटले आणि त्यामुळे त्यांनी राष्ट्रगीताला दुय्यम स्थान दिलं, याची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

Previous Post
ममतांच्या ‘युपीए अस्तित्वात आहेच कुठे?’ विधानावर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले...

ममतांच्या ‘युपीए अस्तित्वात आहेच कुठे?’ विधानावर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Next Post
'किती आले आणि गेले भाजपाचं काही वाकड करू नाही शकले'

‘किती आले आणि गेले भाजपाचं काही वाकड करू नाही शकले’

Related Posts
fadanvis - munde

भाजपने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी, धनंजय मुंडे यांची खरमरीत टीका 

मुंबई – ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर विरोधकांकडून महाविकास आघाडीवर खूप टीका करण्यात आली. आम्ही आरक्षणाच्या…
Read More
Theft News | जेवणात मिसळायची अंमली पदार्थ... मोलकरीण करत असे चोरीचे काम, कसे उघड झाले रहस्य?

Theft News | जेवणात मिसळायची अंमली पदार्थ… मोलकरीण करत असे चोरीचे काम, कसे उघड झाले रहस्य?

Theft News : उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. घरातील अन्न शिजवण्यासाठी ज्या मोलकरणीवर…
Read More
उद्योगात गुंतवणूक वाढविण्यासाठी ईडीबी-एमआयडीसी यांच्यात सामंजस्य करार

उद्योगात गुंतवणूक वाढविण्यासाठी ईडीबी-एमआयडीसी यांच्यात सामंजस्य करार

मोका (मॉरिशस) – इंडो-मॉरिशस बिझनेस फोरमच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मॉरिशसमधील उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More