अनियमित पाणी पुरवठ्याची तक्रारी, आमदार रासने पहाटेच पोहचले नागरिकांच्या दारात

अनियमित पाणी पुरवठ्याची तक्रारी, आमदार रासने पहाटेच पोहचले नागरिकांच्या दारात

कसबा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी कामाचा धडाकाच लावला आहे. गेल्या आठवड्यात कचरामुक्त कसबा अभियानाची सुरुवात त्यांनी केल्यानंतर आता त्यांनी पाणीपुरवठ्याच्या बाबतीत नागरिकांना येत असणाऱ्या समस्यांचा मुद्दा हाती घेतला आहे. यासाठी त्यांनी आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समवेत मतदारसंघात पाहणी दौरा केला. यावेळी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत अधिकाऱ्यांना या समस्या लवकरात लवकर दूर करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले, कसबा मतदारसंघातील नागरिकांना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये हे माझे प्राथमिक उद्दिष्ट आहे. त्यासाठी आज कसबा  मतदार संघातील पाण्याचा समस्या सोडवण्यासाठी पुणे महापालिका पाणी पुरवठा खात्यातील प्रमुख अधिकारी श्री. नंदकुमार जगताप यांना सोबत घेत मतदार संघातील विविध ठिकाणी पाहणी करत आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीवर जनतेने विश्वास दर्शविला असून कसबा विधानसभा मतदारसंघातील जनतेने सर्वाधिक ९० हजार मते मला दिली. हा जो आशीर्वाद मला जनतेने दिला आहे. लोकांनि दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत आहे. पाण्याच्या अनियमित वेळा, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा तसेच काही भागात अनियमित पाणीपुरवठा या सर्व समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी पुणे महापालिका पाणी पुरवठा खात्यातील प्रमुख अधिकारी श्री. नंदकुमार जगताप यांना सोबत घेत मतदार संघातील विविध ठिकाणी पाहणी दौरा केलेला आहे. यावेळी लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येईल असा विश्वास यावेळी नागरिकांना दिला.

कचरा मुक्त आणि ट्राफिक मुक्त कसबा करण्यासाठी देखील आम्ही पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार आहोत.सफाई कार्म्चार सफाई करत असताना त्याच्या हाताला कचरा लागणार नाही असे नियोजन करण्यात येणार आहे.  कसबा मतदारसंघातील सर्व प्राथमिक समस्या येत्या सहा महिन्यात सोडविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे असेही रासने यांनी सांगितले.

या पाहणी दौऱ्यावेळी मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्यासह सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
सकाळी सात वाजता पाहणी दौरा करणारा पहिला आमदार

हा पाहणी दौरा सुरु असताना एक आजोबा हेमंत रासने यांना भेटले. त्यांनी हेमंत रासने यांच्या या दौऱ्याचे तोंडभरून कौतुक केले. गेल्या सत्तर वर्षात सकाळी सात वाजता पाहणी दौरा करणारे पहिले आमदार मी पाहिले असे सांगत रासने यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. सोबतच पाण्याच्या अनियमित वेळा, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा यासारखे प्रश्न रासने नक्की सोडवतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

Previous Post
थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला मुदतवाढ

थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला मुदतवाढ

Next Post
राज्यात पुन्हा कंत्राटी भरती सुरु करून भाजपाकडून तरुणांच्या स्वप्नावर नांगर फिरवण्याचे काम - Nana Patole

राज्यात पुन्हा कंत्राटी भरती सुरु करून भाजपाकडून तरुणांच्या स्वप्नावर नांगर फिरवण्याचे काम – Nana Patole

Related Posts
मविआच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचे भाजपा-शिंदे सेनेचे षडयंत्र | Nana Patole

मविआच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचे भाजपा-शिंदे सेनेचे षडयंत्र | Nana Patole

Nana Patole | विधानसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक झाली पाहिजे, मतदान वाढले पाहिजे असे निवडणूक आयोग सांगत असते…
Read More
Ramesh Chennithala | महाराष्ट्र काँग्रेस विचाराचे राज्य; लोकसभेची लढाई जिंकली आता लक्ष्य विधानसभा

Ramesh Chennithala | महाराष्ट्र काँग्रेस विचाराचे राज्य; लोकसभेची लढाई जिंकली आता लक्ष्य विधानसभा

Ramesh Chennithala |  लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन काम केले, जिल्हा, ब्लॉक स्तरावर संघटनेला चालना दिली. उमेदवारी…
Read More