कोथरुडमधील समान पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करा! चंद्रकांत पाटलांचे निर्देश

कोथरुडमधील समान पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करा! चंद्रकांत पाटलांचे निर्देश

कोथरुड ( Chandrakant Patil) विधानसभा मतदारसंघातील समान पाणी पुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. तसेच, पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवठ्याचा  ( Chandrakant Patil)आढावा चंद्रकांत पाटील यांनी आज घेतला. या बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, अधिक्षक अभियंता श्रीकांत वायदंडे, प्रसन्नराघव जोशी, कार्यकारी अभियंता विनोद क्षीरसागर, उप अभियंता प्रशांत कदम, कनिष्ठ अभियंता गणेश काकडे उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पुणे आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील कामाबाबतचा सविस्तर तपशील नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या समोर मांडला. समान पाणीपुरवठा प्रकल्प अंतर्गत पुणे शहरात १४१ झोन निश्चित केले असून त्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात एकूण १७ झोन आहेत. प्रत्येक झोन मध्ये अस्तित्वातील GSR अथवा प्रस्तावित ESR/ GSR (पाण्याच्या टाक्यांमधून) झोनसाठी पाणीपुरवठा प्रस्तावित आहे. अस्तित्वातील वितरण नलिका व आवश्यकतेनुसार नवीन जलवाहिन्या टाकून नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे, असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी नामदार पाटील यांना दिली.

तसेच, कोथरूड मतदारसंघातील १७ झोनमधील अस्तित्वातील नवीन पाण्याच्या टाक्यांपैकी १६ टाक्यांचे काम पूर्ण झाले असून; आयडियल कॉलनी टाकीच्या जागेबाबत लॉ कॉलेज, पुणे महानगरपालिका यांच्यामध्ये जागेबाबत न्यायालयीन वाद सुरू आहे. त्यामुळे पाण्याचे टाकीचे काम अपूर्ण असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.त्यावर सदर सर्व कामे जलदगतीने पूर्ण करावीत; तसेच आयडियल कॉलनीच्या टाकीचा प्रश्न सामोपचाराने सर्वांना विश्वासात घेऊन मार्गी लावावा, अशा सूचना दिल्या.

समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कोथरुड मधील १७ झोन मध्ये २८३९७ इतके AMR मीटर बसविणे प्रस्तावित असून २३२०९ AMR मीटर बसवण्यात आले असून उर्वरित सुमारे ५००० AMR मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. सदर कामामुळे पाण्याच्या गळतीचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी झाले असून २०% पर्यंत कमी करण्यासाठी आवश्यक कामे सुरु आहेत, अशी माहिती ही अधिकाऱ्यांनी पाटील यांना दिली.

त्यावर पाटील यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी पाहता, खडकवासला मधून पाणीपुरवठा होणे शक्य नाही. त्यामुळे पुणेकरांसाठी मुळशी धरणातून पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून; त्यावर लवकरच मार्ग निघेल, असा विश्वास व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

वाघाचे कातडे पांघरुन लांडगा वाघ होत नाही, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा उबाठावर हल्लाबोल

‘हिंमत असेल तर गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवा’, बॉलीवूड गायकाचं थेट योगींना आव्हान

गजा मारणेच्या गुंडांकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण; मुरलीधर मोहोळ यांचा संताप

Previous Post
सरकारी जाहिरातींवर कोट्यावधींचा खर्च, पण महिला संमलेनाध्यक्षांचं नावही नाही; काँग्रेसचा संताप

सरकारी जाहिरातींवर कोट्यावधींचा खर्च, पण महिला संमलेनाध्यक्षांचं नावही नाही; काँग्रेसचा संताप

Next Post
सेल्फी घेण्याच्या नावावर तरुणाचा पूनम पांडेला किस करण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

सेल्फी घेण्याच्या नावावर तरुणाचा पूनम पांडेला किस करण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

Related Posts
५१ लघुपटांच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना देणार मानवंदना 

५१ लघुपटांच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना देणार मानवंदना 

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरुणाई पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ग्रंथ, पुस्तक यामधून शिवराय…
Read More

महाराष्ट्र हा काही गांडूची औलाद नाही! संजय राऊतांनी तोफ डागली

मुंबई : खासदार संजय राऊत आणि भाजप यांच्यातील राजकीय वाद आता टोकाला जाण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी…
Read More
Shambhuraje Desai

आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार – शंभूराजे देसाई 

सातारा – सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत (Satara District Bank Election) राष्ट्रवादीने (NCP) झालेला पराभव गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraj…
Read More