Hemant Rasane | ‘कचरा मुक्त कसबा मतदारसंघा’ची संकल्पना, हेमंत रासने यांचे पुणे महानगरपालिका प्रशासनाला निवेदन

'कचरा मुक्त कसबा मतदारसंघा'ची संकल्पना, हेमंत रासने यांचे पुणे महानगरपालिका प्रशासनाला निवेदन

Hemant Rasane | कसबा मतदारसंघाच्या कसबा, विश्रामबाग व भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याची समस्या भेडसावत आहे. सदरील भाग हा दाट लोकवस्ती, मुख्य बाजार पेठ तसेच निवासी भाग, असा संमिश्र असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा होत असतो. महानगर पालिकेने कंटेनर मुक्त कचरा व्यवस्थापन केलेले असले तरी सदरील जागांवर अजून कचरा टाकला जात आहे. व सदरील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने नागरिकांना विविध आरोग्यविषयक समस्या उद्भविण्याची शक्यता आहे. त्यावर तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी कसबा विधानसभा भाजपा निवडणूक प्रमुख हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी पुणे महानगरपालिका जनरल सहा. आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्याकडे केली.

कसबा, विश्रामबाग आणि भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या ६ प्रभागांच्या विविध प्रश्नांसंदर्भात रासने यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळांने पुणे महापालिका जनरल सहायक आयुक्त रवींद्र बिनवडे आणि अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची आज भेट घेतली. यावेळी “कचरा मुक्त कसबा मतदार संघ ” संकल्पना राबवण्यासाठी महानगर पालिकेने सहकार्य करण्याची विनंती रासने यांनी केली. तसेच कसबा मतदारसंघातील मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक कोंडीचीही समस्या सोडविण्याची मागणी हेमंत रासने यांनी महापालिका प्रशासनाकडे केली.

दरम्यान, पावसाळी समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी तसेच प्रभागातील काही प्रलंबित समस्या लवकर सोडवण्यासाठीचे निवेदन देखील देण्यात आले. पावसाळी गटार लाईन स्वच्छ नसल्यामुळे विविध ठिकाणी पावसाचे पाणी तुंबून नागरिकांच्या घरांमध्ये व दुकानांमध्ये शिरत आहे. परिणामी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच ड्रेनेज लाईन साफ न केल्यामुळे विविध ठिकाणी ड्रेनेज तुंबणे आणि त्याचे पाणी उलटे नागरिकांच्या घरात जाणे तसेच धोकादायक झाडे, फांद्या पडणे अशा समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने नागरिकांना दिलासा देण्यासाठी पालिकेने योग्य ती कारवाई करण्याची मागणी रासने यांनी केली आहे.

यावेळी कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, आदी तसेच कसबा मतदारसंघातील इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Sunil Tatkare | तुमच्या ताकदीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात शक्तिशाली बनवायचं आहे

Sunil Tatkare | तुमच्या ताकदीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात शक्तिशाली बनवायचं आहे

Next Post
Dheeraj Ghate | बुवाबाजी करून राजकारणाला बट्टा लावणाऱ्या पटोलेंनी राजीनामा द्यावा! भाजपच्या धीरज घाटेंची मागणी

Dheeraj Ghate | बुवाबाजी करून राजकारणाला बट्टा लावणाऱ्या पटोलेंनी राजीनामा द्यावा! भाजपच्या धीरज घाटेंची मागणी

Related Posts
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा स्वीकारला जाणार?, आज दिल्लीत होणार अंतिम निर्णय

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा स्वीकारला जाणार?, आज दिल्लीत होणार अंतिम निर्णय

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या हाराकिरीनंतर राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा…
Read More
गजा मारणेच्या गुंडांकडून मुरलीधर मोहोळ यांच्या माणसाला मारहाण

गजा मारणेच्या गुंडांकडून मुरलीधर मोहोळ यांच्या माणसाला मारहाण

पुण्यात पुन्हा एकदा गजा मारणेच्या ( Gaja Marne) टोळीचा दहशतवादी उपद्रव समोर आला आहे. या गुंडांनी केंद्रीय मंत्री…
Read More
Pune Accident | पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह ! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या कारची टेम्पोला धडक

Pune Accident | पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह ! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या कारची टेम्पोला धडक

Pune Accident  | पुण्याचे महाराष्ट्राचे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते बंडू गायकवाड यांचे पुत्र यांनी मंगळवारी…
Read More