यूपीतील दारूण पराभवानंतर देखील प्रियंका वाड्रा यांचं कौतुक, महाराष्ट्र काँग्रेसकडून अभिनंदनाचा ठराव

मुंबई – देशात नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. पंजाब,उत्तराखंड, गोवा आणि उत्तर प्रदेशात पक्ष चांगली कामगिरी करेल अशी भाबडी आशा लावून बसलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. विशेषतः पंजाब आणि उत्तर प्रदेशातील पराभव हा सर्वात जास्त मानहानीकारक परभव म्हणून पहिला जात आहे.

युपीत भाजपचा पराभव करण्याची जबाबदारी खांद्यावर असणाऱ्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींना अपयश आले. ढिसाळ नियोजन,परिवारवादामुळे खिळखिळी झालेली संघटना महाराष्ट्रात शिवसेनेसोबत केलेली युती आदी कारणांमुळे यूपीतील जनतेने कॉंग्रेसला नाकारले. मात्र असे असताना देखील प्रियांका गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव महाराष्ट्र कॉंग्रेसने मांडला आहे.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांच्यासोबत महाराष्ट्र आहे, हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे. आम्ही त्यांच्या समर्थनार्थ आहोत, हेच सांगायचं आहे. त्यासाठी, काँग्रेसचे सर्व आमदार, मंत्री आणि पदाधिकारी आज होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशसारख्या खाली मैदानात मोठ्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी वाढवली असा दावा कॉंग्रेसकडून करण्यात येत असून त्यामुळे, त्यांच्या कामाचं कौतूक करायचं आहे, त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही आजच्या बैठकीत मांडायचा असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. लोकमतने याबाबतचे वृत्त दिले आहे.