पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा पुन्हा ताकदीने फडकेल – नाना पटोले

पुणे : पुणे हा काँग्रेस विचारांचा जिल्हा आहे, या जिल्ह्यात आजही काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. सातत्याने काँग्रेसचा झेंडा या भागात फडकत राहिला आहे आणि यापुढेही तो तसाच फडकत राहिल. पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढेल त्यादृष्टीने काम करा. पुणे जिल्ह्याबरोबरच २०२४ साली राज्यातही काँग्रेसचा झेंडा पूर्ण ताकदीने फडकेल असा विश्वास महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारंप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. संजय जगताप, आ. संग्राम थोपटे, उपाध्यक्ष देविदास भन्साळी, अलकाताई रुपवते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नाना पटोले पुढे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची मतं वाढली आहेत. पुणे जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली पाहिजे, पुणे जिल्हा काँग्रेसचा पारंपरिक जिल्हा असून दुसऱ्यांना मागणार नाही, काँग्रेस येथे स्वबळावर लढेल, त्याची तयारी केली आहे. पुढचा काळ पुणे जिल्ह्यात काँग्रेससाठी चांगला काळ असेल. पक्ष संघटना मजबूत करा आपल्याला यश मिळेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

You May Also Like