काँग्रेसला कोणाचीही जमीन आणि निधी लुटण्याचा अधिकार नाही – Raosaheb Patil Danve

काँग्रेसला कोणाचीही जमीन आणि निधी लुटण्याचा अधिकार नाही - Raosaheb Patil Danve

Raosaheb Patil Danve | नॅशनल हेराल्डची मालमत्ता हडपणा-या काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपाचा कडवा विरोध असून काँग्रेसचे हे आंदोलन बेगडी असल्याचे टीकास्त्र भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी बुधवारी सोडले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. काँग्रेसला आंदोलनाचा अधिकार आहे मात्र कोणाचीही जमीन आणि निधी लुटण्याचा अधिकार नाही अशा शब्दांत पाटील दानवे यांनी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला .

यावेळी नॅशनल हेराल्ड प्रकरणाचे वास्तव समोर मांडताना पाटील दानवे म्हणाले की, 1937 साली उदात्त हेतूने 5 हजार स्वातंत्र्यसैनिकांनी सुरू केलेले हे वर्तमानपत्र आणि संबंधित कंपनी कधीही नेहरू, गांधी कुटुंबाची जहागीर नव्हती. नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्रावर किंवा त्यांच्या मालमत्तेवर गांधी कुटुंबाची मालकी होती,अशा प्रकारची नोंद कुठेच नाही. त्यांना कायदेशीर अधिकार नाही. नॅशनल हेराल्डची मोठी मालमत्ता गिळंकृत करण्याचा कट काँग्रेसने रचून ‘यंग इंडिया’ नावाची कंपनी स्थापन केली आणि मालमत्तेचा दुरोपयोग करण्यात आला असा घणाघाती आरोप श्री. पाटील दानवे यांनी केला.

कालांतराने 2008 साली आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्यामुळे या वर्तमानपत्राचे प्रकाशन थांबले. तेव्हा काँग्रेस पक्षाने ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ या कंपनीला 90 कोटींचा निधी दिला. खरेतर कोणत्याही खासगी संस्थेला पक्षाचा निधी देणे हे बेकायदेशीर असूनही काँग्रेसने हा निधी दिला असेही  दानवे पाटील यांनी नमूद केले. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 साली काँग्रेस नेत्यांवर ‘आर्थिक फसवणुकीचा’ आरोप करत एक याचिका दाखल केली होती. त्या याचिकेमध्ये ‘यंग इंडिया प्रायव्हेट लिमीटेड’ने कवडीमोल रकमेत 90.25 कोटी रुपये वसूल करण्याचा उपाय काढला, जो ‘नियमांच्या विरोधात’ जाणारा आहे असे म्हटले होते. आता या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानुसार सरकारी यंत्रणेने चौकशी केली असून पुढची कारवाई सुरू आहे असेही पाटील दानवे ( Raosaheb Patil Danve) म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

मी भाजपपासून वेगळा झालो तरी मरेपर्यंत हिंदुत्त्व सोडणार नाही; उद्धव ठाकरेंचे विधान | Uddhav Thackeray

भाजपात बदलाचे वारे; पुणे शहराध्यक्षपदावरही फेरबदलाची शक्यता

MPSC विद्यार्थ्यांच्या तांत्रिक अडचणी दूर करा;रुपाली पाटील ठोंबरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Previous Post
ब्राम्हणांना आपलाच इतिहास बघायला लाज वाटते! ‘फुले’ चित्रपटाच्या सेन्सॉरशिपवरून कश्यपचा परखड सवाल

ब्राम्हणांना आपलाच इतिहास बघायला लाज वाटते! ‘फुले’ चित्रपटाच्या सेन्सॉरशिपवरून कश्यपचा परखड सवाल

Next Post
त्यांच्या बुडावर बाळासाहेबांनी लाथच घातली असती; बावनकुळेंचा घणाघात

त्यांच्या बुडावर बाळासाहेबांनी लाथच घातली असती; बावनकुळेंचा घणाघात

Related Posts
वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन आणि वैद्यकीय आरोग्य यंत्रणा असे दोन स्वतंत्र विभाग करा- पवारांचे निर्देश

वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन आणि वैद्यकीय आरोग्य यंत्रणा असे दोन स्वतंत्र विभाग करा- पवारांचे निर्देश

Deputy CM Ajit Pawar:- शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रूग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन…
Read More
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचे सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी

Rahul Gandhi | इंडिया आघाडीचे सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी

Rahul Gandhi | लोकसभेची ही निवडणूक लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाने संविधानावर…
Read More
सद्भावना यात्रेच्या पार्श्वभूमीवर कानिफनाथ, भगवानबाबा व नगद नारायणला सामाजिक सौहार्दासाठी प्रातांध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे साकडे.

सद्भावना यात्रेच्या पार्श्वभूमीवर कानिफनाथ, भगवानबाबा व नगद नारायणला सामाजिक सौहार्दासाठी प्रातांध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे साकडे.

Harshvardhan Sapkal | महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची थोर परंपरा आहे. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणेच वागावे अशी आपली शिकवण आहे. देशाला…
Read More