भारत जोडो यात्रेत कॉंग्रेसने केला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आपमान ?

Mumbai – भारत जोडो यात्रेची शेगावात अखेरची जाहिर सभा झाली त्या सभेला राष्ट्रवादी पक्षाचे नेते एकनाथराव खडसे मा राजेश टोपे यांची व्यासपिठावर उपस्थीती असतांना त्यांना राहुल गांधीच्या समोर भाषणाला संधी न देता त्यांचा जाहिर कांग्रेस नेत्यानी आपमान केल्याची टिका भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली . या मागचे रहस्य नेमके काय? असे त्यांनी म्हटले आहे.

यात्रेला पाठींबा देण्यासाठी महाविकास अघाडी घटक म्हणुन शेगावच्या जाहिर सभेत खडसे टोपे यांची उपस्थीती होती. माजी मंत्री फौजिया खान  यांच्यासह जेष्ठ नेते अरुण गुजराती तर शिवसेनेचे नरेंद्र खेडेकर होते . पण त्या सभेत कोंग्रेस . नेत्या शिवाय इतरांना बोलू दिले नाही .

राजकिय दृष्टया हा खर तर राष्ट्रवादी आणि ठाकरे शिवसेनेचा आपमान जाणिव पुर्वक करण्याचा प्रकारच म्हणावा लागेल . खडसे जेष्ठ नेते असून त्यांना भाषणा पासून दुर ठेवले असल्याची टिका कुलकर्णी यांनी केली . हा धोका ओळखून यात्रेत   शरदचंद्र पवार साहेब आणि उद्धव ठाकरे सहभागी झाले नसावेत असे ते म्हणाले .

जाहिर सभेची संयोजक म्हणुन जबाबदारी प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांची असून संभाव्य धोका ओळखून सभेच्या व्यासपिठावर बसलेल्या राष्ट्रवादी आणि ठाकरे शिवसेनेचा नेत्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याची टिका राम कुलकणी यांनी केली.