अगंबाई! लग्नाबद्दल पहिल्यांदाच बोलले राहुल गांधी, कशी मुलगी हवी? कोणते गुण असावेत? सर्वकाही सांगितलं

मुंबई: काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना राजकारणातील Most Eligible Bachelor असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. वयाच्या ५२व्या वर्षीही ते अविवाहित आहेत. मात्र आता पहिल्यांदाच ते आपल्या लग्नाबद्दल बिनधास्त बोलले (Rahul Gandhi On Marriage) आहेत. त्यांना लग्नासाठी कशी मुलगी पाहिजे? तिच्या कोणते गुण असले पाहिजेत?, सर्वकाही त्यांनी सांगितले आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान यूट्यूब चॅनेल मॅशेबल इंडियाच्या बॉम्बे जर्नी स्पेशल एपिसोडमधील मुलाखतीत ते बोलत होते.

राहुल गांधींना लग्नासाठी अशी मुलगी आवडेल, जिच्यामध्ये त्यांची आजी इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि आई सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे गुण असतील. राहुल गांधींना त्यांच्या आजीसोबतच्या नात्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, “ती माझ्या आयुष्यातील प्रेम होती. ती माझी दुसरी आई होती.”

इंदिरा गांधींसारखे गुण असलेल्या मुलीशी लग्न कराल का?, असे विचारले असता ते म्हणाले, “हा एक मनोरंजक प्रश्न आहे. मला अशी मुलगी हवी आहे, जिच्यात माझ्या आजी आणि आईचे गुण मिसळलेले असतील.”