काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने गळफास घेऊन स्वतःला संपवलं; कुटुंबीयांवर कोसळला दुखाचा डोंगर 

काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने गळफास घेऊन स्वतःला संपवलं; कुटुंबीयांवर कोसळला दुखाचा डोंगर 

पटना | काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते शकील अहमद खान यांचा मुलगा अयान जाहिद खान याने स्वतःला गळफास लावून आत्महत्या ( Suicide News) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पटना येथील सरकारी निवासस्थानी घडली असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अयानचे वय अवघे १७-१८ वर्षे होते. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अयान रात्री खोलीत झोपला होता. मात्र, सकाळी तो उठला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी खोली उघडून पाहिले असता, तो गळफास घेतलेल्या अवस्थेत ( Suicide News) आढळला. अयान हा शकील अहमद खान यांचा एकुलता एक मुलगा होता. आता त्यांच्या कुटुंबात एक मुलगी उरली आहे.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, तपासासाठी एफएसएल (फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी) टीम बोलावण्यात आली आहे. ही घटना सचिवालय पोलिस स्टेशन परिसरात घडली असून, पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. शकील अहमद खान हे बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील काबर कोठी गावचे रहिवासी आहेत. त्यांनी पटना विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण, तसेच दिल्लीतील जेएनयूमधून एमए, एमफिल आणि पीएचडी पूर्ण केली आहे.

शकील अहमद खान यांनी २०१५ मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर कटिहारच्या कडवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. २०२० मध्येही ते आमदार झाले आणि पक्षाने त्यांना विधिमंडळ पक्षाचे नेतेपद सोपवले. सध्या बिहारमध्ये काँग्रेसचे १९ आमदार आहेत.या घटनेने काँग्रेस पक्षात हळहळ व्यक्त केली जात असून, शकील अहमद खान यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अयानच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेनेचे मंत्री आठवड्यातून तीन दिवस जनतेच्या भेटीला

आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर ४८ तासात कारवाई करा- Rupali Chakankar

नक्षलवाद्यांनी घरात घुसूत फरफटत बाहेर नेलं अन् माजी सभापतीला निर्दयीपणे संपवलं

Previous Post
'तो दिवसरात्र त्याच्या मागे लागायचा', युवराजने अभिषेक शर्माला कसे तयार केले? वडिलांनी खुलासा केला

‘तो दिवसरात्र त्याच्या मागे लागायचा’, युवराजने अभिषेक शर्माला कसे तयार केले? वडिलांनी खुलासा केला

Next Post
टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मासोबत डेटिंगची चर्चा; कोण आहे ती मिस्ट्री गर्ल?

टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मासोबत डेटिंगची चर्चा; कोण आहे ती मिस्ट्री गर्ल?

Related Posts
sanjay raut

महाराष्ट्रावर घाव घातला जात आहे, पण शिवसेना तसं होऊ देणार नाही – संजय राऊत

मुंबई – विधान परिषदेच्या निकालाने (Result of the Legislative Council) महाविकास आघाडीला (MVA) झटका बसला असून, शिवसेनेतील (Shivsena)…
Read More
बीड आणि परभणीत काय घडलं याचं उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी द्यावे - Supriya Sule

बीड आणि परभणीत काय घडलं याचं उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी द्यावे – Supriya Sule

Supriya Sule | बीड आणि परभणीमध्ये झालेल्या घटना दुर्दैवी आहेत. महाराष्ट्राला तीन आठवड्यांपासून गृहमंत्री नाहीत. माझी अपेक्षा होती…
Read More

“आजवर छेड काढणाऱ्या ४ पोरांना धुतलंय…,” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा

Actress Surabhi Bhave: मराठी मनोरंजन सृष्टीतील बेधडक आणि स्पष्टवक्त्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री सुरभी भावे हिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील…
Read More