Nana Patole | दलितांना नेहमी पायाखाली ठेवण्याची काँग्रेसची मानसिकता; पटोले बनले टीकेचे धनी

Nana Patole | चिखलाने माखलेले स्वत:चे पाय दुसऱ्याच्या हाताने धुवून घेणे ही काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोलेंची शोषणकर्ती मानसिकता आहे. मिळालेल्या पदाच्या जोरावर दुसऱ्यांना पायाखाली ठेवण्याची मानसिकता दर्शविणारा हा प्रकार आहे. हा प्रकार अत्यंत घृणास्पद असून दलित हितासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आल्याचा दावा करणाऱ्या मल्लीकार्जून खरगे यांनी शोषक मानसिकतेच्या नाना पटोलेंना (Nana Patole) तात्काळ पदावरून बडतर्फ करावे, असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल राजकीय दौऱ्यावर असताना त्यांचे चिखलाने पाय माखले. त्यानंतर त्यांनी ते एका व्यक्तीकडून धुवून घेतल्याच्या घृणास्पद प्रकारावर ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी संतप्त प्रतिक्रीया दिली आहे.

दलित, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींना नेहमी पायाखाली ठेवण्याची मानसिकता काँग्रेस आणि नाना पटोलेंची राहिलेली आहे. सत्ता आणि पद मिळाले की ती आणखी प्रबळ होते. ते यापूर्वी खैरलांजी सारख्या प्रकरणातूनही दिसून आले आहे. आता पुन्हा त्याच मानसिकतेने डोके वर काढले आहे. हुकूमशाही, सेवा करवून घेणारी, शोषणकर्ती मानसिकता हेच नाना पटोलेंच्या कार्यकर्तृत्वाचे द्योतक आहे, असा घणाघातही ॲड. मेश्राम यांनी केला.

या प्रकरणावरून त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना थेट आव्हान दिले आहे. इतरांकडून सेवा करवून घेणाऱ्या जुलमी मानसिकता अंगी बानावलेल्या नाना पटोले यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून थेट बडतर्फ करा, अशी मागणी ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे. मल्लिकार्जून खरगे यांनी पटोलेंना पदावरून बडतर्फ करून काँग्रेसचे नेतृत्व अशा शोषक मानसिकतेचा विरोध करीत असल्याचे देशाला दाखवून द्यावे, असे थेट आव्हान मेश्राम यांनी खरगेंना दिले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like