कॉंग्रेस आमदार जिग्नेश मेवाणीला अटक; स्वरा भास्कर म्हणाली….

मुंबई –  काँग्रेस (Congress)आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी (Jignesh Mewani)यांना आसाम पोलिसांनी अटक केली आहे. जिग्नेशला गुजरातमधील पालनपूर सर्किट हाऊसमधून अटक करण्यात आली आहे. आसाममधील एका प्रकरणात जिग्नेश मेवाणीला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी प्रथम जिग्नेश मेवाणीला अहमदाबादला नेले आहे (Jignesh Mewani has been taken to Ahemadabad). तेथून आसामला नेण्यात येत आहे. जिग्नेश गुजरातच्या वडगाम विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,त्यांना बुधवारी रात्री पालनपूर सर्किट हाऊस येथून अटक करण्यात आली. मेवाणीला अहमदाबादला नेण्यात आले आहे, पुढे त्याला  गुवाहाटीला नेण्यात आल्याचे वृत्त आहे. जिग्नेश मेवाणीच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार, आसाम पोलिसांच्या पथकाने त्याला आसाममध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक केली आहे. दरम्यान, या अटकेनंतर आता अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिने आपला निषेध नोंदवला आहे.

अभिनेत्रीने ट्विटरवर #FreeJigneshMevani म्हणत ट्विट केले आहे.  बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट करत म्हंटले की, ‘जिग्नेश मेवाणीच्या मित्राकडून नुकताच असा मेसेज मिळाला की, जिग्नेशला आत्ताच आसाम पोलिसांनी पालमपूर सर्किट हाऊसमधून अटक केली आहे. त्याचे फोन देखील काढून घेण्यात आले आहेत. एफआयआरची प्रत देखील कोणाकडे नाही.. हे काय चालले आहे? जिग्नेश मेवाणीला का अटक केली? #FreeJigneshMevani RT करा आणि शेअर करा’.